पश्चिम उपनगरातील समस्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी साधला नगरसेवकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:19 AM2020-11-22T09:19:51+5:302020-11-22T09:19:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०२२ मध्ये होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता शिवसेना जोमाने कामाला लागली आहे. विशेष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२२ मध्ये होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता शिवसेना जोमाने कामाला लागली आहे. विशेष म्हणजे एकीकडे पर्यावरणमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आता उपनगरावर आपले लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. पश्चिम उपनगरातील समस्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी नुकताच नगरसेवकांशी संवाद साधला.
पश्चिम उपनगरातील आर-उत्तर, आर-दक्षिण, आर-मध्य या प्रभागांतील शिवसेना नगरसेवकांची भेट घेऊन विकासकामे, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर आदित्य ठाकरे यांनी नुकतीच सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा केली.
या वेळी विभागातील नगरसेवकांच्या वतीने विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांनी विभागातील विविध विकासकामे, समस्यांवर आधारित निवेदन ठाकरे यांना दिले. या प्रसंगी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या कार्य-अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
सदर प्रसंगी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रीद, तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे, गीता सिंघण, माधुरी भोईर, शुभदा गुढेकर, गीता भंडारी उपस्थित होते.
--------------------------------------