आदित्य ठाकरे यांनी साधला समर्थनगर- लोखंडवाला परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

By मनोहर कुंभेजकर | Published: May 14, 2024 03:06 PM2024-05-14T15:06:18+5:302024-05-14T15:06:27+5:30

यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम सर्वांनी मतदान केलं पाहिजे. सर्वप्रथम राष्ट्र तसेच आपण ज्या राज्यात राहतो त्या महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत सामाजिक व राजकीय हीत कोण जपत! याची जाणीव ठेवून मतदान केलं पाहिजे असे सांगितले.

Aditya Thackeray interacted with the citizens of Samthargar- Lokhandwala area | आदित्य ठाकरे यांनी साधला समर्थनगर- लोखंडवाला परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

आदित्य ठाकरे यांनी साधला समर्थनगर- लोखंडवाला परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

मुंबई- उद्धव सेना व महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख,माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्सोवा सेलिब्रेशन क्लब येथे वर्सोवा लोखंडवाला येथे समर्थनगर- लोखंडवाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधला. या प्रचार सभेचे उद्धव सेना व महाविकास आघाडी वर्सोवा विधानसभेच्या वतीने काल रात्री आयोजन केले होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम सर्वांनी मतदान केलं पाहिजे. सर्वप्रथम राष्ट्र तसेच आपण ज्या राज्यात राहतो त्या महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत सामाजिक व राजकीय हीत कोण जपत! याची जाणीव ठेवून मतदान केलं पाहिजे असे सांगितले.

 कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी केलेल्या कामाचं कौतुक आजही  समाजात होत असते.आमचे सरकार ज्या पद्धतीने पाडले  व महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ घडवली व राजकीय  अस्थिरता निर्माण कोणी निर्माण केली याची जाणीव ठेवून आपण मतदान करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले.

ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला ते सर्व घाबरून प्रतिपक्षात गेले.परंतू अमोल कीर्तीकर यांनी त्यांच्यावर कितीही जरी दबाव आला तरी ते ठामपणे उद्धव सेनेच्या बाजूने उभे राहिले हीच त्यांची जमेची बाजू आहे.ही निवडणूक ते पक्षनिष्ठेच्या आधारावर लढत असून त्याला भरघोस प्रतिसाद द्यावा अशी विनंती करत त्यांनी भाषणाचा समारोप केला. 

मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले व संवाद साधला.तर अमोल कीर्तिकर यांनी येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.तसेच कीर्तिकर यांना वर्सोवा विधानसभा मतदार संघातून मोठा लिड मिळवून देण्याचे आश्वासन वर्सोवाकरांनी दिले.

यावेळी विभागप्रमुख,आमदार अँड.अनिल परब, माजी आमदार बलदेव खोसा, खासदार प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सचिव-राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे,माजी नगरसेवक  राजू पेडणेकर, राजेश शेट्ये, शभावना जैन, प्रदीप टपके आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Aditya Thackeray interacted with the citizens of Samthargar- Lokhandwala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.