मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:21 AM2023-08-08T06:21:33+5:302023-08-08T06:21:50+5:30

पूर्व आणि पश्चिम दाेन्ही द्रुतगती महामार्ग महापालिकेकडे, दुरुस्तीही महापालिकेची, मग फुकटचा टोल तुम्ही का घेता? मुंबईकरांकडून कर आणि टोल दोन्ही वसूल का करता? आदित्य ठाकरे यांचा सवाल; पाचही टाेल बंद करा - मनसे

Aditya Thackeray, MNS tune in on Mumbai toll; Only two become five, that's all... | मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच...

मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग एमएसआरडीसीने महापालिकेकडे दिले. या रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेने करायची, आणि त्यावरचा कोट्यावधीचा टोल एमएसआरडीसीने वसूल करायचा. हा कसला न्याय? या दोन्ही मार्गांवरची ही टोळधाड ताबडतोब बंद करा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करत माजी मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी खळबळ उडवून दिली. दोन टोल नाके कसले बंद करता? पाचही टोलनाके बंद करा, अशी मागणी करत मनसेने ठाकरे यांच्या टोल आंदोलनात उडी घेतली.

ठाकरे यांनी दोन्ही टोलनाके बंद करण्याची मागणी केली असतानाच मुंबईतील पाचही टोलनाके बंद करा, अशी मागणी मनसेचे संजय शिरोडकर यांनी केली. 

मनसेचे नेते माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी वेगळाच सूर लावला. अडीच वर्षे तुमचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी घोषणा का नाही केली? त्यामुळे टोलसंदर्भातील त्यांची ही मागणी गांभीर्याने घ्यायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. 

nया दोन्ही रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी पालिकेच्या खर्चातूनच या गोष्टी होत आहेत. 
nमहापालिका मुंबईकरांकडून कर घेते. या कराच्या पैशातून या रस्त्याची डागडुजी आणि देखभाल केली जात आहे. असे असताना तिथल्या टोलनाक्याचा, रस्त्यावरील होर्डिंगचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय?

nमुंबईकर आधीच महापालिकेला कर भरतात. आता टोलचा पैसाही मुंबईकरांनी का द्यावा? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी?
nमुंबईकर कर भरतोय हे मान्य असेल तर या दोन्ही मार्गांवरील टोलनाके बंद करा. कंत्राटदार तुमचे मित्र असतील तर त्यांच्याशी ‘वन टाइम सेटलमेंट’ करा. 
nमहापालिकेने एमआरएसडीसीला दोन हजार कोटी दिले आहेत. ते कशासाठी आणि का दिले आहेत हे माहीत नाही. 

मुंबईत टोलमधून जमा होणारा पैसा नगर विकास खात्यात जातो. त्याच्या माध्यमातून विकासाचीच कामे होतात. तो पैसा मातोश्रीवर जात नाही.
- प्रवीण दरेकर, भाजप नेते
आम्हाला विचारणाऱ्यांनी ते सरकारमध्ये होते तेव्हा हे काम का केले नाही, याचे उत्तर द्यावे.
- मंगल प्रभात लोढा, 
मंत्री, महाराष्ट्र शासन

Web Title: Aditya Thackeray, MNS tune in on Mumbai toll; Only two become five, that's all...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.