Join us

आदित्य ठाकरे, उमर खालिद एका मंचावर?; CAA, NRC, NPR विरोधात मुंबईत छात्र परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 9:10 PM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशभरात असंतोषाचे वातावरण आहे.

मुंबई : छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने ५ जानेवारीला मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नोंदणी नागरिकत्व (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) विरोधी छात्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशभरात असंतोषाचे वातावरण आहे. जामिया, अलिगढ विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली गेली. या काळ्या कायद्याचा विरोध होणे ही आजची महत्त्वाची मागणी असली पाहिजे. देशातील आदिवासी, मुस्लिम आणि भटक्या जमातींना देशातून हाकलून लावण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले हे आंदोलन आता जन आंदोलन बनत चालले आहे. त्याचाच भाग म्हणून छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला देशभरातून विद्यार्थी नेते उपस्थित राहणार आहेत. 

मुंबईत सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांचा या परिषदेत सहभागी असणार आहे. या परिषदेसाठी दिल्लीचे छात्र नेते उमर खालिद, यूपीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, हरियाणाचे युवा नेते प्रदीप नरवाल, जेएनयुचे विद्यार्थी नेता रामा नागा, जामियाचे विद्यार्थी नेता हम्मादुररहमान, मुंबईच्या विद्यार्थी नेत्या सादिया शेख, टीस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष भट्टा राम, छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे उपस्थित राहणार असून गीतकार जावेद अख्तर, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार रोहित पवार, स्वागताध्यक्ष फारुक शेख यांना आंमत्रित केले आहे,अशी माहिती परिषदेचे निमंत्रक सचिन बनसोडे यांनी दिली आहे.  

दरम्यान, या परिषदेत JAC Mumbai, AISF, SFI, ASA, TISS Student Unions, Samyak, MASU, SIO, CYSS, PSU, AIPC, DYF, AYW, Vidhyarthi Bharati, Mumbai Graduate Forum या विद्यार्थी समविचारी विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत.

टॅग्स :आदित्य ठाकरेनागरिकत्व सुधारणा विधेयकमुंबई