Join us

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा अनुभवली रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांची कला

By मनोहर कुंभेजकर | Published: December 11, 2022 4:14 PM

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू आणि स्वेट ऑन क्लबच्या पुढाकाराने गेल्या रविवारी आणि आज रहदरीमुक्त स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटला रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळ धाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट

मुंबई —

रोज आपल्या राजकीय कार्यक्रमात सतत कार्यमग्न राहून युवासेनेचा डोलारा यशस्वीपणे संभाळणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी सुमारे १ तास दिंडोशीच्या रहेजा गार्डन येथील सुमारे एक किलो मीटर रहदरीमुक्त रस्त्यावरील चिमूरडे, लहान मुले व मोठ्यांनी सादर केलेल्या विविध कलेचा मनमुराद आनंद लुटला.

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू आणि स्वेट ऑन क्लबच्या पुढाकाराने गेल्या रविवारी आणि आज रहदरीमुक्त स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटला रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळ धाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्ण, नगर संतोष नगर इत्यादी वसाहतीतील सुमारे दहा ते पंधरा हजार दिंडोशीवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला. निमित्त होते ते दिंडोशी नागरीं निवारा समोर असलेल्या रहेजा हाईट्स ते रहेजा गार्डन हा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता आज सकाळी ०७ ते १० या वेळेत रहदारीसाठी बंद केला होता. त्यामुळे येथील राहदरीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांसह लहान मोठ्यांनी सुद्धा या रस्त्यावर आपली कला सादर करून आदित्य ठाकरे यांची शाबासकी मिळवली. 

यावेळी गुरुकुल आणि हरणाई विद्यालयाच्या लेझिम पथकाने विशेष लक्ष वेधून घेतले. तेथे असलेली ईव्ही स्वतः चालवत ठाकरे यांनी प्रवेश केला व प्रत्येक विभागाला भेट देऊन कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने गराडा घातला. 

यावेळी आमदार व विभागप्रमुख, माजी महापौर सुनील प्रभू, शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर, आयोजक युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू, माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर,माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, पावन जाधव, रुपेश कदम, युवासेना सह सचिव समृद्ध शिर्के, सिने अभिनेते अंकित मोहन, स्वेट ऑन क्लबचे मालक अरुण कोकरियाल, हर्ष सोनी, स्मिता सोनी, सर्व शिवसेना, युवासेना व इतर अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

 या स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ, असे वेगवेगळे खेळ, व्यायाम व फिटनेस प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, कॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिगने केलेले योगाची प्रात्यक्षिके, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे आणि आलेल्या अडचणींवर कसे मिळवायचे यावर उपाय आदी कलागुणांना देणारे प्रकारांचा आनंद लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी लुटला.

मुलांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन स्वेट ऑन क्लब यांच्या सहकार्याने हा उपक्रम येथे राबवला. आम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाची पोचपावती हि या कार्यक्रमाला जमलेली गर्दी हि आहे असे आमदार आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. तसेच हे यश एका कोणी व्यक्तीचे नसून हे रहेजा हाईट्स आणि येथील परिसरातील राहणाऱ्या नागरिकांचे आहे ज्यांनी आज येथे मोठया प्रमाणात गर्दी करून उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे असे आयोजक अंकीत प्रभू यांनी सांगितले.

टॅग्स :आदित्य ठाकरे