Join us

आदित्य ठाकरे यांनी दिंडोशीत पुन्हा एकदा अनुभवली रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांची कला

By मनोहर कुंभेजकर | Published: December 10, 2023 7:18 PM

यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी तरुणाईने गराडा घातला.

मुंबई — रोज आपल्या राजकीय कार्यक्रमात सतत कार्यमग्न राहून  युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी सुमारे दीड तास दिंडोशीच्या नागरी निवारा लगत असलेल्या रहेजा गार्डन येथील सुमारे एक किलो मीटर रहदरीमुक्त रस्त्यावरील चिमूरडे, लहान मुले व मोठ्यांनी सादर केलेल्या विविध कलांचा मनमुराद आनंद लुटला.

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू आणि स्वेट ऑन क्लबच्या पुढाकाराने गेल्या रविवारी आणि आज रहदरीमुक्त स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटला रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळ धाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्ण, नगर संतोष नगर इत्यादी वसाहतीतील सुमारे दहा हजार दिंडोशीवासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला.यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी तरुणाईने गराडा घातला. स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटला 10000 दिंडोशीवासीयांचा टॉपक्लास प्रतिसाद मिळाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढत त्यांनी अंकीत प्रभू आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

 निमित्त होते ते दिंडोशी नागरीं निवारा समोर असलेल्या रहेजा हाईट्स ते रहेजा गार्डन हा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता आज सकाळी 7 ते 11 या वेळेत रहदारीसाठी बंद केला होता. त्यामुळे येथील रहदरीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांसह लहान मोठ्यांनी सुद्धा या रस्त्यावर आपली कला सादर करून आदित्य ठाकरे यांची शाबासकी मिळवली. 

यावेळी शिवसेना नेते, आमदार माजी महापौर सुनील प्रभू, शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर, महिला विभागसंघटक साधना माने,आयोजक युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत सुनील प्रभू, अभिनेते संदीप पाठक,माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर,विधानसभा संघटक प्रशांत कदम,माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, युवासेना सह सचिव समृद्ध शिर्के,शाखाप्रमुख संदीप जाधव व शाखाप्रमुख संपत मोरे, युवासेनेचे रुपेश कदम,प्रशांत मानकर तसेच सर्व शिवसेना, युवासेना व इतर अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

 या स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कराटे,कब्बडी, स्केटिंग, बुद्धिबळ, असे वेगवेगळे खेळ, व्यायाम व फिटनेसचे प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, जादूचे प्रयोग,कॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिगने केलेली योगाची प्रात्यक्षिके, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे आणि आलेल्या अडचणींवर कसे मिळवायचे यावर उपाय आदी कलागुणांना देणाऱ्या विविध प्रकारांचा आनंद लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी लुटला.

मुलांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन स्वेट ऑन क्लब यांच्या सहकार्याने हा उपक्रम येथे राबवला. आम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाची पोचपावती हि या कार्यक्रमाला जमलेली अलोट गर्दी हि आहे असे आमदार आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. 

यंदा स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटचे चौथे वर्ष असून हे यश एका कोणी व्यक्तीचे नसून हे रहेजा हाईट्स आणि येथील परिसरातील राहणाऱ्या नागरिकांचे आहे. ज्यांनी गेल्या रविवारी आणि आज येथे मोठया प्रमाणात गर्दी करून  उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे आयोजक अंकीत प्रभू यांनी सांगितले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई