राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये भाजपाचे नेते नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना नितेश राणे यांनी या ड्रग्ज प्रकरणावरील प्रश्नावरुन थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना फोर सिझनमधील पार्ट्यांबद्दल माहिती आहे आणि त्यांना विचारा असा दावा केला आहे. नवाब मलिकांनी पर्यटन मंत्र्यांकडून अधिक माहिती घ्यावी असं म्हटलं आहे. तसेच परमबीर सिंग हा मुंबईचा सीपी असताना सर्वात जास्त सीपी ऑफिसमध्ये सर्वात जास्त काळ आदित्य ठाकरे बसायचे. मग त्याला माहित नाही परमबीर सिंग कुठे आहे?, आम्ही म्हणायचं का आदित्य ठाकरे यांचा परमबीरला पळवण्यात हात आहे का? परमबीर सिंग आणि सचिन वाझे सर्वात जास्त लाडका आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री यांचा होता.
अनिल देशमुखांची शुभ दिवाळी झाली तर अनिल परबांची मेरी ख्रिसमस होणार का?, असं मी ट्विट केलं. १०० कोटी वसूल करायला आम्ही वसूल करायला सांगितलं, नवाब मलिकांच्या जावयाला आम्ही ड्रग्ज विकायला सांगितले. म्हणजे १०० कोटी वाटत असताना भाजपवाल्यांना का हिस्सा दिला नाही?, सर्व हप्ते वसुली पचत असताना केंद्रीय तपास यंत्रणेची नजर गेली. मग तुम्ही बोंब मारायची. तुम्ही असं न करता राज्याचा कारभार सांभाळायचा ना! संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी नेहमी पत्रकार परिषद घ्यावी आणि महाविकास आघाडीची कबर आणखी खोदावी.
नवाब मलिकांनी एक सीसीटीव्ही फुटेज दाखवावं, मग मी दाखवतो सीसीटीव्ही कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसायचं. सुशांत सिंग, दिशा सालियनच्या वेळी, टीआरपी वेळेला परमबीर पाहिजे. परमबीर सिंग हा मुंबईचा सीपी असताना सर्वात जास्त सीपी ऑफिसमध्ये सर्वात जास्त काळ आदित्य ठाकरे बसायचे. मग त्याला माहित नाही परमबीर सिंग कुठे आहे?, आम्ही म्हणायचं का आदित्य ठाकरे यांचा परमबीरला पळवण्यात हात आहे का? परमबीर सिंग आणि सचिन वाझे सर्वात जास्त लाडका आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री यांचा होता. परमबीर सिंग सीपी असताना सीपी ऑफिसमध्ये सर्वात जास्त आदित्य ठाकरे जात होते. परमबीर सर्वात जास्त मांडीवर घेऊन त्याला फिरायचे. त्यावेळचे सीपी ऑफिसचे सीसीटीव्ही तपासा आणि सीडीआर रेकॉर्ड तपासा असा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी. जेवढं ते बोलतायत तेवढी ते महाविकास आघाडीची कब्र खोदत चालले आहेत. याचं आम्हाला निश्चित समाधान आहे. तुम्हाला फोर सिझनमधील पार्ट्यांची माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्या पर्यावरण मंत्र्यांना विचारा. फोर सिझनमध्ये पार्ट्या कशा व्हायच्या कोणाबरोबर व्हायच्या याची माहिती मंत्रीमंडळातील पर्यावरण मंत्र्यांकडे चांगल्या पद्धतीने आहेत,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.