वरळीतील विकासकामांचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:16+5:302021-07-18T04:06:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरळी परिसरातील विविध ठिकाणी सुरू असलेली विकासकामे आणि लसीकरण शिबिरे यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ...

Aditya Thackeray reviews development work in Worli | वरळीतील विकासकामांचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

वरळीतील विकासकामांचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वरळी परिसरातील विविध ठिकाणी सुरू असलेली विकासकामे आणि लसीकरण शिबिरे यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली.

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि अंबामाता मंदिर, जाम्बोरी मैदान येथे लसीकरण सुरू आहे. एनएससीआय येथे आदित्य बिर्ला ग्रुपच्या सौजन्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि जाम्बोरी मैदान येथे आरपीजी फाउंडेशन आणि सुराना ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या सौजन्याने बीडीडी चाळ आणि परिसरातील रहिवाशांसाठी प्रत्येकी एक हजार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न असून, यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. लसीकरणासाठी नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी मदत करणाऱ्या सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, वैद्यकीय पथकांना ठाकरे यांनी धन्यवाद दिले. ठाकरे यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, सहाय्यक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

पोलीस वसाहतीतील विकासकामांचा आढावा

पोलिसांसाठी पायाभूत सुविधांचा विकास, कवायतीसाठी जागा व सुशोभीकरणाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत ठाकरे यांनी वरळी येथील सफेद मैदानास भेट दिली. येथील पोलीस वसाहतीच्या दुरुस्ती कामाचाही त्यांनी आढावा घेतला. नरेश पाटील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम त्वरित हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागामार्फत सर्वेक्षण, मॅपिंग, सॅनिटायझेशन अशा विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

Web Title: Aditya Thackeray reviews development work in Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.