Join us  

Gulabrao Patil: आदित्य ठाकरेंनी वयाचा विचार करावा, अन्यथा; गुलाबरावांनी थेट दमच भरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 3:17 PM

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंकडून सातत्याने होत असलेल्या टिकेवरुन पलटवार केला होता.

मुंबई - राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांकडून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीची चढाओढ सुरू असल्याचं दिसून येत आहे. यातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुनही वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पटाील यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर याबाबत माहिती दिली. तसेच, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करताना एकप्रकारे दमच भरला. दसरा मेळाव्याचा विषय प्रलंबित असून आम्ही परवानगी मागितल्याचं पाटील यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंकडून सातत्याने होत असलेल्या टिकेवरुन पलटवार केला होता. ते गोधडीत होतं, तेव्हा आम्ही शिवसैनिक होतो, असं ते म्हणाले होते. त्यानंतर, आज पदभार स्विकारल्यानंतरही गुलाबरावांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर तोफ डागली. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच असल्याचंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे हे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत. आदित्य यांना एकट्याला आमदार होण्यासाठी दोन विधानपरिषद द्याव्या लागल्या आहेत. जर, तुम्हीच खरे वारसदार होता मग दोन एमएलसी का दिल्यात, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला. तसेच, आदित्या यांनी टिका करताना आमच्या वयाचा विचार करावा, नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये एवढे कठीण आहोत की तुम्हाला आवरणार नाही, असा इशाराच पाटील यांनी दिला आहे. 

वरिष्ठांचा आदेश पाळू 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देत आता थेट शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरेही पाहायला मिळू शकतात अशीही चर्चा आहे. तसेच मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चांही आता रंगू लागली आहे. याचदरम्यान तो आमचा विषय नाही, वरिष्ठ जे आदेश देतील तो आम्ही पाळू, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 

आदित्य ठाकरेंना काय अधिकार?

बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी आम्हाला मोठे केले आहे. Who is Aaditya Thackeray? आम्ही गद्दार आहोत हे बोलण्याचा त्यांना काय अधिकार? गद्दारी तुम्ही केली. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याशी आघाडी केली. आम्ही तुमच्यामागे नतमस्तक होऊन गेलो. आम्ही तुमचं ऐकलं. परंतु आमदारांची कामे होत नव्हती. आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या. परंतु त्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

३२ वर्षाचं पोरगं गोधडीत होतं, ते आमच्यावर टीका करतंय

दरम्यान, ३५ वर्ष आम्ही काय केले सगळ्यांना माहिती आहे. कुणी झेंडा लावायला तयार नव्हतं तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे, तडीपारी भोगणारे, जेलमध्ये जाणारे आम्ही आहोत. ३०२ आमच्यावर आहेत. ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे गोधडीत होता तो आमच्यावर टीका करतोय. तुम्ही संपत्तीचे मालक होऊ शकता परंतु विचारांचे वारस होऊ शकत नाही. विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. तुमचं पक्षात योगदान काय आहे? उद्धव ठाकरेंचे चिरंजीव. उद्धव ठाकरेंना आमच्यावर बोलण्याचा १०० टक्के अधिकार परंतु आदित्य ठाकरेंचा मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं.  

टॅग्स :गुलाबराव पाटीलजळगावशिवसेनाआदित्य ठाकरे