मुंबई : महापालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूम स्टुडिओला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करून मुंबईतील हे मॉडेल राज्यात कसे राबविता येईल यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टिष्ट्वटच्या माध्यमातून दिली. या वेळी दोन्ही मंत्र्यांशी ५०० हून अधिक शाळा आणि ३०० हून अधिक वर्ग व त्यातील विद्यार्थी व्हिडीओ कॉन्फरन्सिगने जोडले जाऊन त्यांच्याशी कनेक्ट झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांनी या दोन्ही मंत्र्यांशी संवाद साधताना त्यांना विविध प्रश्न ही विचारले. एका विद्यार्थ्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना तुम्हाला कोणता खेळ आवडतो, असा प्रश्न विचारला असता मला सारेच खेळ आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळ ही माझी आवड असून त्यासोबत अभ्यासही केला आणि म्हणून प्राध्यापिका झाल्याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. तसेच येणाऱ्या काही काळात व्हर्च्युअल स्टुडिओच्या माध्यमातून विविध खेळाडू आणि उत्तम युवा आमदार, व्यक्तिमत्त्व यांचा संवाद आपण विद्यार्थ्यांशी करून देण्याचा प्रयत्न करू, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले.२०११ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात व्हर्च्युअल क्लासरूम्सची स्थापना करण्यात आली. सध्या , मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी या ४ माध्यमांच्या एकूण ४८० शाळांमध्ये तज्ज्ञ व्याख्यानांचे थेट प्रक्षेपण होते. या एकूण शाळांपैकी ३६० शाळा या प्राथमिक तर १२० शाळा माध्यमिक विभागाच्या आहेत. यासाठी २०२०-२१च्या पालिकेच्या शिक्षण अर्थसंकल्पातही तरतूद ही करण्यात आली आहे. ही तरतूद प्राथमिकसाठी ७.२१ कोटी तर माध्यमिकसाठी ४.३८ कोटी इतकी आहे.‘खेळाडू, युवा आमदारांचा संवाद घडवणार’व्हर्च्युअल स्टुडिओच्या माध्यमातून विविध खेळाडू आणि उत्तम युवा आमदार, व्यक्तिमत्त्व यांचा संवाद आपण विद्यार्थ्यांशी करून देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळेल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले़