Join us

आदित्य ठाकरेंचं ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र, पुण्यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 12:42 PM

शिर्डीच्या धर्तीवर मध्यम आकाराचे सॅटेलाइट विमानतळ उभारण्यासाठी साडेतीन ते चार किलोमीटर लांबी तसेच सहाशे ते आठशे मीटर रुंदीची धावपट्टी उभारणे गरजेचे असून त्यासाठी सुमारे एक हजार एकर जागेची आवश्यकता लागेल.

मुंबई - पालघर जिल्ह्यात सॅटेलाइट विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला असल्याने जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर, फर्दापूर येथेही नवीन विमानतळ बांधण्याच सातत्याने मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी पत्र लिहून राज्यातील ४ विमानतळांसदर्भात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, पालघर आणि फर्दापूरच्या विमानतळाचे काम सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. 

शिर्डीच्या धर्तीवर मध्यम आकाराचे सॅटेलाइट विमानतळ उभारण्यासाठी साडेतीन ते चार किलोमीटर लांबी तसेच सहाशे ते आठशे मीटर रुंदीची धावपट्टी उभारणे गरजेचे असून त्यासाठी सुमारे एक हजार एकर जागेची आवश्यकता लागेल. तत्कालीन पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीच पालघर विमानतळ संदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर, पालघर जिल्हा प्रशासनाने सलग क्षेत्रफळ असणाऱ्या काही जागांची माहिती संकलित करून ती भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील ४ विमानतळांचा विकास करण्याची मागणी केली आहे. 

पालघर जिल्ह्यात आणि फर्दापूर येथे नव्याने विमानतळ सुरू करण्याच्या कामाला सुरुवात करावी. तर, पुणे आणि नाशिक येथेही नवीन विमनतळ बांधण्यासंदर्भात स्पष्टी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आदित्य यांनी या पत्राद्वार केली आहे.  

टॅग्स :आदित्य ठाकरेज्योतिरादित्य शिंदेपुणेविमानतळ