वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिले आहे.
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर एकत्र चर्चेला या, असं चॅलेंज आज आदित्य ठाकरे यांनी दिले. मी मुख्यमंत्र्यांना आजही सांगतो त्यांनी माझ्यासोबत मीडियासोबत चर्चा करण्यासाठी यावे. घटनाबाह्य मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यास तयारच नाहीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादकांना एक रकमी FRP देण्याचा सरकारचा निर्णय
वेदांता-फॉक्सकॉन सारखे काही प्रकल्प राज्या बाहेर गेले आहेत. हा प्रकल्प राज्याबाहेर गेलेच कसे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक प्रकल्प राज्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज राज्याचे हाल होत असताना आम्हाला हे बघू वाटत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही या प्रकल्पासाठी आंदोलने करतो तेव्हा आम्हाला काहीजण शेंबडी पोरं म्हणतात. पत्रकारांवरही टीका केली जाते. सत्तेत असणारी काही वेगळी मस्ती दाखवली जात आहे. कृषीमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. या संदर्भात कुणीही बोलत नाही. मुख्यमंत्री यावर कारवाई करत नाहीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.