बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात, तर प्रभू श्रीरामांच्या चौपाईने शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 08:16 PM2022-05-14T20:16:29+5:302022-05-14T20:17:15+5:30

भाषणाच्या सुरुवातीलाच, मला सभास्थळी येताना माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांच्या गर्दीत दिसली, असे म्हणत बाळासाहेबांची आठवण आदित्य यांनी काढली

Aditya Thackeray's speech begins with Balasaheb's memory and ends with Shri Ram's Chaupai | बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात, तर प्रभू श्रीरामांच्या चौपाईने शेवट

बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात, तर प्रभू श्रीरामांच्या चौपाईने शेवट

Next

मुंबई : भाजप नेत्यांकडून सातत्याने होणारी टिका, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याचा वाद आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा. दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि विरोधकांकडून सातत्याने शिवसेनेवर होणारी टिका, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे आज मुंबईतील बीकेसी मैदानात त्यांची जोरदार सभा झाली. या सभेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. आदित्य यांनी विकासकामांवर भाषण करत राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. आपलं हिंदुत्त्व हे चूल पेटवणारं, भूक भागवणारं असल्याचंही आदित्य यांनी म्हटले. 

भाषणाच्या सुरुवातीलाच, मला सभास्थळी येताना माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांच्या गर्दीत दिसली, असे म्हणत बाळासाहेबांची आठवण आदित्य यांनी काढली. त्यानंतर, राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढाच त्यांनी वाचला. कोविड काळात, लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने याच बीकेसी मैदानात मोठं कोविड सेंटर उभारल्याची आणि धारावीतील परिस्थिती हाताळल्याची आठवण करुन दिली. आदित्य यांनी विकासाच्या मद्द्यावरुन भाषण केलं. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांच्या आठवणीने आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर, ''रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाए पर वचन न जाए,'' असे म्हणत प्रभू श्रीरामांच्या चौपाईने भाषणाचा शेवट केला. 
 
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत राज्यासह देशात लॉकडाऊन लागला. या कालावधीत मुख्यमंत्री बऱ्याचशा बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहिले. ते मंत्रालयातही फारसे फिरकले नाहीत. मंत्रिमंडळाच्या बहुतांश बैठकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका विरोधकांनी केली. त्याच टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज शिवसेनेची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेनंतर उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी दौऱ्यातून विरोधकांना उत्तर देणार आहेत.
 

Web Title: Aditya Thackeray's speech begins with Balasaheb's memory and ends with Shri Ram's Chaupai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.