उपोषणाचा प्रशासनाने घेतला धसका, वन विभागाने केले सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:19 AM2019-02-05T04:19:18+5:302019-02-05T04:19:47+5:30
वनजमिनींचे रक्षण करण्यासाठी उरण तालुक्यातील मोठी जुई येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा दणका देताच वन विभागाला जाग आली.
अलिबाग : वनजमिनींचे रक्षण करण्यासाठी उरण तालुक्यातील मोठी जुई येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा दणका देताच वन विभागाला जाग आली. ग्रामस्थांच्या उपोषणाची गंभीर देखल घेत त्यांनी तातडीने वनजमिनीची मोजणी करण्यास सुरुवात केली. बेकायदा वन जमिनींचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे वन विभाग आणि महसूल प्रशासन यामध्ये नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
संरक्षित वनांच्या जागेत बेकायदा झाडे तोडून वनविभागाचे असलेले बुरुज हटवून त्या वन जमिनी लाटण्याचा प्रकार मौजे मोठी जुई-उरण गावातील मौजे कोप्रोली आणि कळंबुसरे गावाच्या लगत सुरू आहे. वन विभागाच्या सर्व्हेे नं. ३४६ व सर्व्हे नं. १२२ मध्ये मे.दादाजी धाकजी लॉजिस्टीक प्रा. लि.ने बेकायदेशीरपणे वन जमिनींवर अतिक्रमण करून मातीचा भराव टाकण्यात येत आहे. दिवसाढवळ््या घडणाºया प्रकाराकडे वन प्रशासनाने दुर्लक्ष के ल्याची ग्रामस्थांची धारणा झाली आहे. असे प्रकार डोळ््यादेखत घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले जात आहे. मौजे कोप्रोली येथील राखीव वनपरिक्षेत्रात मालकी मिळकत सर्व्हेनं. २८ लगत वनजमिनींवर बेकायदा उत्खनन करणाºयांच्या विरोधात तत्काळ पंचनामा करून गुन्हा दाखल करावा याबाबत ग्रामस्थांमार्फत जिल्हा कार्यालयात ९ आणि १२ जानेवारी २०१८ रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते.
तक्रारी सोबत फोटोही जोडले होते मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र वनअधिकारी उरण, सहायक वनसंरक्षक पनवेल यांना अर्ज करून स्थळ पाहणीसह पंचनामे करण्याची विनंतीही करण्यात आली होती. प्रशासनाकडून कोणतीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.
आंदोलकांच्या आक्र मक पवित्र्याने वनविभागाचे चांगलेच धाबे दणाणले. वनविभागाचे उरणचे उपवनसंरक्षक शशांक कदम आपल्या लवाजम्यासह उत्खनन झालेल्या ठिकाणी जाऊन वनसर्व्हेअर संतोष नांदगावकर यांनी सहकाºयांच्या मदतीने जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजणी करायला सुरु वात केली. त्यामुळे वनजमिनींमध्ये किती अंतर अतिक्रमण करून उत्खनन आणि भराव केला आहे हे समोर येणार आहे.
संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत वनांच्या संरक्षणाच्या बाबतीत लक्षवेधी उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
चार दिवसांपासून ग्रामस्थांचे उपोषण सुरूच
स्वातंत्र्यापूर्वी चिरनेर जंगल सत्याग्रहात मोठी जुई गावच्या रामा कोळी यांना हौतात्म्य आले होते. तर सीना भोईर आणि सोमा गोवारी यांना बंदुकीच्या गोळ््या लागल्या होत्या. त्याच गावातील जंगलावर बेकायदा अतिक्रमण करून वनसंपदाच नष्ट केली आहे. गेले चार दिवस ग्रामस्थ वनांच्या संरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ग्रामस्थांच्या उपोषणाच्यामुळे जंगलहक्काबाबतीत नव्या क्र ांतीचा जन्म होणार आहे, असे आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
साडेचार कोटींचा दंड
बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी संबंधिताला साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याविरोधात अपील दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे निकालापूर्वी कारवाई करता येत नाही. त्याचप्रमाणे वन विभागाने जागेची मोजणी केली आहे. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असे उरणचे नायब तहसीलदार संदीप खोपणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वनांच्या जागेत अतिक्र मण करून दगड, मातीचे उत्खनन करूनही वन व महसूल विभागाच्या अधिकाºयांची भूमिका संशयास्पद आहे. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे.
- नितेश पाटील,
आंदोलक
वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागाने वन जमिनींची मोजणी आणि सर्वेक्षण केले आहे हे खरे आहे. मात्र याबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
- शशांक कदम,
निवासी वनअधिकारी