पोस्टमार्टेम पॅथोलॉजी लॅबच्या कारभाराचे
By admin | Published: January 29, 2015 02:21 AM2015-01-29T02:21:54+5:302015-01-29T02:21:54+5:30
पॅथोलॉजी म्हणून रक्त चाचणी करण्याचे ठिकाण एवढेच सर्वांना ज्ञात असते़ मात्र येथे नेमके काय चालते?
पॅथोलॉजी म्हणून रक्त चाचणी करण्याचे ठिकाण एवढेच सर्वांना ज्ञात असते़ मात्र येथे नेमके काय चालते? ही लॅब चालवण्यासाठी काय शिक्षण लागते? किंवा रक्ताचे नमुने कसे तपासले जातात? याबाबत सर्वच अनभिज्ञ असतात़ मात्र सर्वसामान्यांना याची इत्थंभूत माहिती असणे आवश्यकच आहे़ ही माहिती शोधताना ‘टीम लोकमत’ला आलेले अनुभव हे थक्क करणारेच आहेत़ कारण यातील काही लॅब या सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास सुरू आहेत़ त्यामुळे या मेगा स्टिंगद्वारे ‘टीम लोकमत’ने पॅथोलॉजी लॅबचे केलेले हे पोस्टमार्टेम़़़
बायो-केम क्लिनिकल लॅबोरेटरी
वेळ : दुपारी १२;१५ मि.
ही लॅब चक्क घरातच चालवली जाते. पुढील बाजूला लॅब आणि मागच्या बाजूला घर आहे. येथे डॉक्टर नसतात असे पहिल्या दिवशी सांगितले. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने डॉक्टर म्हणून आमच्याशी संवाद साधला. तो खरेच डॉक्टर आहे का? याविषयी प्रश्नचिन्हच होते. लॅब टेक्निशियन नसतानाही येथे सर्रास तपासण्या केल्या जातात.
रिपोर्ट घेतल्यावर झालेला संवाद
रिपोर्टर : डॉक्टरांना भेटू शकतो का?
असिस्टंट : (बाजूला उभ्या असलेल्या पुरुषाकडे पाहून) हेच आहेत डॉक्टर. काय विचारायचंय तुम्हाला?
रिपोर्टर : डॉक्टर, काल माझ्या ताईने युरिन टेस्ट केली होती. यातून शुगर कळते का, असे विचारायला सांगितले होते?
डॉक्टर : (रिपोर्ट पाहून) नाहीये शुगर.
रिपोर्टर : ताईला तुम्हाला भेटायचेदेखील होते. तर कधी वेळ मिळेल तुमचा?
डॉक्टर : सकाळी ११ नंतर यायला सांगा.
रिपोर्टर : रोज या वेळीच असता का?
(या वेळी डॉक्टर आणि महिला असिस्टंटने एकमेकांकडे पाहिले आणि डॉक्टर काही बोलणार इतक्यात मध्येच महिला असिस्टंट बोलल्या)
असिस्टंट : आता पुढचे दोन दिवस डॉक्टर बाहेरगावी जाणार असल्याने ते भेटू शकणार नाहीत. सोमवारी ते परत येतील.
रिपोर्टर : ठीक आहे. मग सोमवारी ताईला सांगतो यायला.
असिस्टंट : सोमवार नको, मंगळवारी यायला सांगा.
रिपोर्टर : ठीक आहे. मंगळवारी ११ नंतर यायला सांगतो. धन्यवाद.
आक्षेपार्ह बाबी
घरामध्येच चालते लॅब
लॅब टेक्निशियन, डॉक्टर नाही
च्रिपोर्टवर डीएमएलटी धारकाची सही
मूत्रामध्ये पाणी मिसळून दिल्यानंतरही रिपोर्ट नॉर्मल
जे. जे. रुग्णालयाजवळ, भायखळा टँक रोड, डोंगरी
जे.जे. रुग्णालया जवळील लॅबमध्ये महाविद्यालयीन मुले काम करतात. ‘लोकमत’ प्रतिनिधी या लॅबमध्ये युरिन चेकअपकरिता गेले असता लॅबच्या टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आढळला. प्रतिनिधीने त्वरितच याबद्दल विचारणा केली असता, कॅमेरा बंद आहे. महिलासुद्धा हेच टॉयलेट वापरतात, असे लॅबमधील मुलाने सांगितले. टॉयलेटमध्ये अशा प्रकारे संशयास्पद पद्धतीने सीसीटीव्ही आढळल्याने प्रतिनिधीने युरिन न देता तपासणीसाठी केवळ पाणीच दिले. मात्र एवढे करूनही रिपोर्टमध्ये पाणी न आढळता ‘युरिन नॉर्मल’ असे निदान झाले. वेळ - सायं ०५: ४५:45
रिपोर्ट घेतल्यानंतरचा संवाद
प्रतिनिधी : रिपोर्ट के बारे में डॉक्टर से पूछताछ करने मिलेगी?
असिस्टंट : नही, पर डॉक्टर से क्यू
मिलना है?
रिपोर्टर : रिपोर्ट नॉर्मल है या नही
कैसा पता चलेगा?
असिस्टंट : उसकी कुछ जरुरत नही, (स्वत:च रिपोर्ट पाहून) रिपोर्ट...तो नॉर्मल है.
रिपोर्टर : पर यहाँ पे डॉक्टर नही बैठते क्या? सलाह देने के लिए?
असिस्टंट : नही... एक बार बोला ना... डॉक्टर की सलाह के लिए आपको अलग से कन्सल्ट करना पडेगा.
रिपोर्टर : ठीक है फिर.
असिस्टंट : पर डॉक्टर के यहाँ जाने की जरुरत नही, आपका रिपोर्ट तो नॉर्मल है... रिपोर्ट्स की फिगर से पता चलता है ना...
आक्षेपार्ह बाबी
च्टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा
च्युरिन न देताही रिपोर्ट नॉर्मल
लॅबमध्ये अप्रशिक्षित
महाविद्यालयीन मुले
लॅब असिस्टंटचा डॉक्टरकडे न
जाण्याचा सल्ला
च्रिपोर्टविषयी कन्सल्ट करणे टाळले