मुंबई : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणे, शाळांच्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्यांचे निराकरण करणे, विद्यार्थ्यांना विविध शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच संपूर्ण प्रशासनाचे शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी योगदान असावे यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रशासनाचा ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये संबंधित क्षेत्राचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी प्रभावीपणे नेतृत्व करणे आणि त्याद्वारे कार्यक्षेत्रातील शाळांच्या समस्या सोडविण्याचे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पायाभूत समस्यांचा अभाव असल्याने अनेकदा पटसंख्येत घट होत असल्याचे समोर येते. याला अनेकदा विभागीय किंवा स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याच्या तक्रारीही समोर येतात.या पार्श्वभूमीवर स्थानिक/ विभागीय प्रशासनाचे शाळांच्या समस्यांकडे लक्ष जावे, त्या वेळेत सोडविल्या जाऊन शाळेच्या अडचणी सोडविल्या जाणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये शाळांना भेट व त्यांचे मूल्यमापन यांसाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सनियंत्रण असणार आहे.उपक्रमादरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी ते तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारीतील विविध विभाग प्रमुख, तसेच जिल्हा शासकीय स्तरावरील कार्यरत वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी यांनी एका वर्षात तीन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे.शाळेला भेट देणाºया अधिकाºयांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी चर्चा करून शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असणार आहे. तसेच वरील अधिकाºयांनी महिन्यातून एकदा शाळेला भेट द्यावी, चालू अभ्यासक्रमाचे काही अध्यापन करावे, तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे असणार आहे. शाळेला भेट देताना अधिकाºयांनी शाळेचा भौतिक सुविधेचा दर्जा, खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, स्वच्छता सवयी, शालेय पोषण आहार या सगळ्याचाही आढावा घेणे आवश्यक असणार आहे. त्याचसोबत शाळेतील धोकादायक बांधकामे, वापराअभावी बंद शौचालये यासारख्या मूलभूत समस्येकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ‘एक दिवस शाळेसाठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 1:16 AM