Join us

अकरावीच्या विशेष फेरीत ६४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. विशेष फेरीसाठी मुंबई विभागातून एक लाख ४५ हजार जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी ७६ हजार २०३ जागांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज प्राप्त झाले होते. या विशेष फेरीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास त्याची निश्चिती लवकरात लवकर योग्य कागदपत्रासह करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयांकडून करण्यात आले आहे.

तीन फेऱ्या होऊनही अकरावी प्रवेशाच्या ६० टक्के जागा रिक्त असून, अनेक विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण संचालनालयाकडून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, त्याची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. विशेष फेरीत अलॉट झालेल्या ६४ हजार ८६६ जागांपैकी कला शाखेच्या पाच हजार २७९, वाणिज्य शाखेच्या ३७ हजार ४८५ जागा, विज्ञान शाखेच्या २१ हजार ४७९ जागा, तर एचएसव्हीसीच्या ६२३ जागांचा समावेश आहे. याचप्रमाणे पहिल्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त ३८ हजार ८७१ विद्यार्थी, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त झालेले दहा हजार ४१ विद्यार्थी, तर तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त झालेले पाच हजार १५९ विद्यार्थ्यांचा समावेश या अलॉटमेंटमध्ये आहे.

विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत राज्य मंडळाचे ६० हजार ७४९, तर सीबीएसई मंडळाचे १८७०, आयसीएसई मंडळाचे एक हजार ४७७, आयबी मंडळाचे ४, आयजीसीएसई मंडळाचे २७५ विद्यार्थी आहेत. खुल्या वर्गातील ३८ हजार ८९७ विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट मिळाली आहे. तसेच एडब्ल्यूएस विद्यार्थ्यांची अलॉटमेंटमधील संख्या पाच हजार ११५ आहे.

--

विशेष फेरीमधील शाखानिहाय अलॉटमेंट

शाखा - अर्ज - अलॉटमेंट

कला- १८,२५४- ५४४१- ५२७९

वाणिज्य - ७९,५५४- ४५,४४१- ३७,४८५

विज्ञान - ४४,५७४- २४,६८९- २१,४७९

एचएसव्हीसी - ३०१९- ६३३- ६२३

एकूण- १,४५,४७३- ७६,२०३- ६४,८६६

शाखानिहाय पसंतीक्रम मिळालेली अलॉटमेंट

पसंतीक्रम - कला - वाणिज्य - विज्ञान - एचएसव्हीसी - एकूण

पहिला - ४३८९- २०,१६७- १३,७११- ६०४- ३८,८७१

दुसरा - ५८८- ६१३०- ३३१७- ०६- १,००,४७१

तिसरा - १६६- ३४६६- १५१४- १३- ५१५९

मंडळनिहाय अर्ज आणि अलॉटमेंट

मंडळ - अर्ज सादर - अलॉटमेंट

एसएससी - ७१,६५०- ६०,७४९

सीबीएसई - २१२३- १८७०

आयसीएसई - १५७०- १४७७

आयबी - ०४- ०४

आयजीसीएसी - ३१८- २७५

एनआयओएस - १८६- १६१

इतर - ३५२- ३३०

एकूण - ७६,२०३- ६४,८६६