Join us

सीईटीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:06 AM

मुंबई : सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवार (दि. १५) पासून परीक्षांना ...

मुंबई : सीईटी सेलने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवार (दि. १५) पासून परीक्षांना राज्यभरात सुरुवात होत आहे. विविध परीक्षांना प्रविष्ट होण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) प्राप्त करून घेण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळावर लिंकद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्जाचा क्रमांक (ॲप्लिकेशन नंबर) आणि जन्मतारीख दाखल करीत प्रवेशपत्राची प्रत मिळवायची आहे. या प्रवेशपत्रावरील माहिती तपासत, तसेच सूचनांचे बारकाईने वाचन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकूण १५ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, टप्प्याटप्प्याने या सर्व शिक्षणक्रमांच्या सीईटीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहेत, असे सीईटी सेलने म्हटले आहे.

मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा १५ सप्टेंबरला होणार आहेत. या सीईटी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या परीक्षांसाठी राज्यातून ५ लाख ५ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीएम गटातून २ लाख २८ हजार ४८६, तर पीसीबी गटातून २ लाख ७७ हजार ३०२ जणांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक विद्यार्थी या सीईटीसाठी आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्यासाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे.