मुंबई-अकरावीच्या इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील रिक्त जागांकरिता २२ ते २६ जून दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या कोट्यातील प्रवेशाकरिता एक फेरी राबविण्यात आली आहे. आता रिक्त जागांवरील प्रवेशाकरिता आणखी एक प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. २७ जून रोजी सकाळी १० वाजता या कोट्यासाठीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर २७ जून ते १ जुलै दरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित ज्युनिअर कॉलेजात प्रवेश निश्चित करायचा आहे. २ जुलैला या कोट्याकरिता प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर रिक्त जागा कॅप फेरीत समाविष्ट केल्या जातील.
विविध कोटांतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक
२२ ते २६ जून - कोटानिहाय रिक्त जागा जाहीर करणे, विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम देणे किंवा त्यात बदल करणे.
२७ जून - विद्यार्थ्यांची कोटावर गुणवत्ता यादी कॉलेजांनी जाहीर करणे. यात निवडलेले व प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना फोन करून कळविणे.
२७ जून ते १ जुलै - निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
२ जुलै - कॉलेजांनी कोट्यातील रिक्त जागा जाहीर कऱणे.