अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील ३८ हजार जागांवर प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:01+5:302020-12-11T04:25:01+5:30
तिसऱ्या फेरीसाठी १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विभागातील अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमध्ये ...
तिसऱ्या फेरीसाठी १ लाख १९ हजार ५८१ जागा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विभागातील अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमध्ये दुसऱ्या फेरीत अलॉट झालेल्या ७८ हजार २३१ जागांपैकी ३८ हजार १५८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. यामधील नियमित केंद्रीभूत प्रक्रियेतून २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनी म्हणजे केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. १० हजार ९७ जागांवर विद्यार्थ्यांनी कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केले आहेत. एकूणच मुंबई विभागात दुसऱ्या फेरीतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्के आहे.
तिसऱ्या फेरीसाठी मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी रिक्त जागांची उपलब्ध संख्या ही १ लाख १९ हजार ५८१ इतकी आहे. दुसऱ्या फेरीमध्ये सर्वात अधिक प्रवेश वाणिज्य शाखेमध्ये १६ हजार १३५, कला शाखेमध्ये २ हजार ९६८, विज्ञान शाखेमध्ये ८ हजार ५६२, तर एमसीव्हीसी ३९६ प्रवेश झाले. पहिला पसंतीक्रम मिळालेल्या २० हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
* कोट्यातून ३५ हजार १३२ प्रवेश
आतापर्यंत कोट्यातून कला शाखेचे २,८८३, वाणिज्य शाखेचे २१,२६४, विज्ञान शाखेचे १०,७५० तर एमसीव्हीसी शाखेचे २३५ प्रवेश निश्चित झाले आहेत.
..........