Join us

आजपासून आयडॉलच्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मंगळवार, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास मंगळवार, म्हणजे आजपासून सुरुवात होत असून, हे प्रवेश ३० जानेवारी २०२१ पर्यंत घेता येतील. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या जानेवारी सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येता येईल. जानेवारीच्या सत्रात विद्यार्थी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र या पाच अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतील, असे आयडॉलने स्पष्ट केले.

जानेवारी सत्रात पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमबरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए व एमकॉममध्येही सेमिस्टर सुरू करण्यात आली आहे. एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रात इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र या विषयांसाठी प्रवेश घेता येईल. एमकॉममध्ये अकाउंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असून सर्व प्रवेश ऑनलाईन आहेत. ....................