Join us

अभियांत्रिकी, फार्मसीसह इतर अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू, १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 7:09 AM

तंत्रशिक्षण विभागाच्या अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र)पदविका, तसेच उच्च शिक्षण विभागाच्या एलएलबी ५ वर्षे, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि कृषी शिक्षण विभागाच्या ८ अशा एकूण १५ प्रवेश प्रक्रियांच्या नोंदणीला बुधवारपासून सुरुवात होत आहे.

मुंबई / पुणे : तंत्रशिक्षण विभागाच्या अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र)पदविका, तसेच उच्च शिक्षण विभागाच्या एलएलबी ५ वर्षे, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि कृषी शिक्षण विभागाच्या ८ अशा एकूण १५ प्रवेश प्रक्रियांच्या नोंदणीला बुधवारपासून सुरुवात होत आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ९ ते १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नाेंदणी करता येईल.फार्मसी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल तर १८ व १९ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना यादीवर आक्षेप नोंदवता येतील. येत्या २१ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात  येईल. तसेच प्रवेशाच्या पहिल्या फेरीस २२ डिसेंबर पासून सुरुवात  होईल. पहिली प्रवेश फेरी ३० डिसेंबरपर्यंत राबविली जाईल. तर ३१ डिसेंबर रोजी सुरू होणारी दुसरी फेरी ८ जानेवारी पर्यंत पूर्ण केली जाईल. फार्मसी महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज ४ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल.

टॅग्स :शिक्षणमहाराष्ट्र