अल्पसंख्याकांसाठी १५ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू- नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:27 AM2020-08-18T02:27:36+5:302020-08-18T02:27:49+5:30

मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात,

Admission process for 15 polytechnics for minorities begins, Nawab Malik | अल्पसंख्याकांसाठी १५ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू- नवाब मलिक

अल्पसंख्याकांसाठी १५ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू- नवाब मलिक

Next

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून, सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
राज्यात दुसºया पाळीतील वर्गांमध्ये १ हजार ९२० इतक्या जागा उपलब्ध असून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात,
सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया सुरू असून लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या आदेशानुसार नंतर वर्ग सुरू करण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती, हेल्पलाइन क्रमांक यासह आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया ही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या   http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
मंत्री मलिक म्हणाले की, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी, ज्यु समाजातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ठाणे, सोलापूर, नांदेड, जळगाव, यवतमाळ, वांद्रे (जि. मुंबई उपनगर), रत्नागिरी, कराड (जि. सातारा), ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर), जालना, अंबड (जि. जालना), पुणे, हिंगोली, लातुर येथील शासकीय तंत्रनिकेतने आणि मुंबईतील शासकीय मुद्रणतंत्र संस्था (सीएसएमटी समोर) येथे दुसºया पाळीतील वर्ग सुरू होणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमधील काही निवडक व्यवसायांचे अभ्यासक्रम दुसºया पाळीत शिकविले जातात. संचालक (तंत्रशिक्षण) यांनी नियमित तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेशाकरिता विहित केलेल्या नियमानुसार दुसºया पाळीत प्रवेश देण्यात येतो. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तर ३० टक्के जागा सर्वसाधारण आणि राखीव प्रर्वगातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
>संकेतस्थळावर माहिती
संस्थेचा पत्ता, संस्था प्रमुख, प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहिती अल्पसंख्याक विभागाच्या   http://mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ई-शासन व इतर - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी संस्थांची यादी पाहू शकता.

Web Title: Admission process for 15 polytechnics for minorities begins, Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.