लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्राला १ जुलैपासून सुरूवात होणार असून, या सत्राला प्रवेश घेण्यासाठी २१ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. २०२१-२२ या वर्षातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण दि. १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी दरमहा ४५० रुपये इतके प्रशिक्षण शुल्क असणार आहे तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थींसाठी ही रक्कम दरमहा शंभर रूपये असणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी आपला अर्ज आपल्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मंबई - ६१ येथे २१ जूनपर्यंत सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
...................................................