वैद्यकीय, दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची लवकरच प्रवेशप्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:26 AM2019-02-09T06:26:40+5:302019-02-09T06:27:03+5:30

राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या वतीने वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

The admission process for the medical, dental postgraduate course soon | वैद्यकीय, दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची लवकरच प्रवेशप्रक्रिया

वैद्यकीय, दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची लवकरच प्रवेशप्रक्रिया

Next

मुंबई  - राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या वतीने वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील ५७ महाविद्यालयांत वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शासकीय तसेच खासगी मिळून १,७७७ जागा आहेत. तर दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३८० जागा आहेत. या जागांवर प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल.

नीट पीजी २०१९ या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उतीर्ण उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व उमेदवारांची गुणवत्ता यादी नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशनकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील प्रवेश प्रक्रियेचेही संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी कक्षाने तयार केले आहे. सरकारची मंजूरी मिळाल्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

असे आहे संभाव्य वेळापत्रक
१० ते २८ फेब्रुवारी : आॅनलाइन नोंदणी.
१० ते २८ फेब्रुवारी : आॅनलाइन नोंदणी व शुल्क.
६ मार्च, सायंकाळी ५ वाजता : प्राथमिक गुणवत्ता यादी.
७ ते १२ मार्च : नीट ‘एमडीएस’साठीची कागदपत्रे पडताळणी.
१३ मार्च ते २० मार्च : नीट पीजी.
२२ मार्च : अंतिम गुणवत्ता यादी.
७ मार्च ते २० मार्च : पसंतीक्रम नोंदणी पात्र उमेदवार.
२१ मार्च ते २७ मार्च : पसंतीक्रम बदलण्याची संधी.
४ एप्रिल : पहिली प्रवेश पात्र यादी.
१२ एप्रिल : पहिल्या यादीनुसार प्रवेश.

राज्यातील लॉ सीईटीसाठी अर्ज लवकरच

मुंबई : मुंबईसह राज्यातील लॉ शाखेच्या तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांसाठी लवकरच सीईटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक खुली करण्यात येईल. प्रवेश परीक्षा यंदा आॅनलाइन होणार असून, परीक्षेची संभाव्य तारीख ११ मे आहे. त्यामुळे लॉ तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सुरुवात करता येईल, असे सीईटी सेलच्या वतीने जाहीर करण्यात आले.
जागांची नोंदणी अंतिम टप्यात असून, मंगळवारपासून लिंक ओपन होण्याची शक्यता आहे. लिंक खुली झाल्यानंतर बारावीचे शिक्षण घेत असलेल्या, लॉ अभ्यासक्रमांसाठी इच्छुकांना अर्ज लिंकद्वारे भरता येतील. गतवर्षी एलएलबीच्या राज्यात १४,३२० जागा होत्या. पैकी १३,७८५ विद्यार्र्थ्यांनी प्रवेश घेतले. ५३५ जागा रिक्त राहिल्या. यंदा नोंदणी पूर्ण झाल्यावर जागांची संख्या स्पष्ट होईल.

Web Title: The admission process for the medical, dental postgraduate course soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.