अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश आजपासून निश्चित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:18 AM2019-08-16T05:18:59+5:302019-08-16T05:19:13+5:30

अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चितीस आजपासून सुरुवात होईल. त्यानुसार विद्यार्थी १६ आणि १९ आॅगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील.

Admission for the special round of the 11th Admission process will be decided from today | अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश आजपासून निश्चित होणार

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश आजपासून निश्चित होणार

Next

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चितीस आजपासून सुरुवात होईल. त्यानुसार विद्यार्थी १६ आणि १९ आॅगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागेल.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून १४ आॅगस्ट रोजी विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करून ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. त्यांना प्रवेश निश्चितीसाठी १९ आॅगस्ट रोजी शेवटची संधी असेल. अकरावी प्रवेशाच्या तीन गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतर घेण्यात आलेल्या विशेष फेरीतही काही महाविद्यालयांच्या कटआॅफ ९० टक्क्यांच्या पलीकडे आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यापासून वंचित आहेत.
विशेष फेरीसाठी १ लाख २६ हजार ५६६ जागा उपलब्ध होत्या. पैकी ५६ हजार ३७५ जागांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील ४८ हजार ६६४ विद्यार्थ्यांना बुधवारी प्रवेश अलॉट करण्यात आले. त्यामुळे आता उर्वरित ७ हजार ७११ विद्यार्थ्यांनाही ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीची वाट पाहावी लागेल. विशेष फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांत वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे १६,७५२ होती. कला शाखेच्या ३,०९१ तर विज्ञानच्या ७,९७९ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. महाविद्यालयांच्या शाखांच्या कटआॅफमधील चढउतार विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांकडे असणारा ओढा स्पष्ट करणारा आहे, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने दिली.

या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
२० आॅगस्टपासून ‘प्रथम येणाºयास प्रथम प्रधान्य’ या फेरीची सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही फेरीमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी (पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट होऊनही), विशेष फेरीपर्यंत कोणतेही महाविद्यालय न मिळालेले, प्रवेश रद्द केलेले तसेच प्रवेश नाकारलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

Web Title: Admission for the special round of the 11th Admission process will be decided from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.