मुंबई : भारतातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे एक चतुर्थांश किशोरवयीन मुले त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये इयत्ता दुसरीच्या पातळीचा मजकूर अस्खलितपणे वाचू शकत नाहीत आणि किमान ४२.७ टक्के इंग्रजीतील वाक्ये वाचू शकत नाहीत, असे निरीक्षण असरच्या (२०२३) बुधवारी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. किशोरवयीन मुलांच्या या पाहणी अहवालात २०१७ च्या तुलनेत मुलांच्या भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.
मुलाच्या (७०.९टक्के) तुलनेत मुलीनी (७६टक्के) त्यांच्या प्रादेशिक भाषेतील दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचण्यात चांगली कामगिरी बजावली. तुलनेत मुलगे अंकगणित सोडवण्यात आणि इंग्रजी वाचनात पुढे असल्याचे दिसून आले.
प्रथम फाऊंडेशनतर्फे हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. यात २८ जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी केलेल्या ३४,७४५ किशोरवयीनांचे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालात ग्रामीण भागातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलाचे सर्वेक्षण केले गेले.
एकूण ८६.८ टक्के शाळा किंवा महाविद्यालयात शिकत होती. म्हणजे उर्वरीत शाळाबाह्य होती. वय जसे वाढत जाते, तसे मुलांचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते असे दिसून आले.
भाषेत पीछेहाटयाआधी २०१७ मध्ये असरमध्ये १४ ते १८ वयोगटातील मुलांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी ७६.६टक्के मुले दुसरीचा मजकूर वाचू शकत असल्याचे दिसले होते. २०२३मध्ये ही संख्या थोडी कमी म्हणजे ७३.६ टक्के इतकी झाली आहे.
अंकगणितात मागेअंकगणितात २०१७ मध्ये, ३९.५ टक्के तरुण एक साधा (इयत्ता तिसरी - चौथी) भागाकार करू शकत होते. २०२३ मध्ये हे प्रमाण ४३.३ टक्के आहे.
वाढत्या वयानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांची वाढती टक्केवारी१४ वर्षे - ३.९ टक्के१६ वर्षे - १०.९ टक्के१८ वर्षे - ३२.६ टक्के