मनोरंजन मैदाने आणि उद्याने मिळणार पाच वर्षांसाठी दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:26 AM2019-11-29T03:26:15+5:302019-11-29T03:26:36+5:30

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खेळाचे व मनोरंजन मैदानाच्या देखभालीचे धोरण तयार झाले आहे. या धोरणानुसार हे भूखंड पाच वर्षांसाठी दत्तक देण्यात येणार आहेत.

Adoption grounds and parks will be adopted for five years | मनोरंजन मैदाने आणि उद्याने मिळणार पाच वर्षांसाठी दत्तक

मनोरंजन मैदाने आणि उद्याने मिळणार पाच वर्षांसाठी दत्तक

googlenewsNext

मुंबई : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खेळाचे व मनोरंजन मैदानाच्या देखभालीचे धोरण तयार झाले आहे. या धोरणानुसार हे भूखंड पाच वर्षांसाठी दत्तक देण्यात येणार आहेत. बिगर शासकीय संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि कॉर्पाेरेट कंपन्यांना यासाठी संधी मिळणार आहे. या भूखंडाची योग्य निगा राखली जात आहे का? याचा दरवर्षी आढावा घेतला जाणार आहे.
मनोरंजन मैदान व उद्यान दत्तक घेण्याच्या धोरणावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थिगिती दिली होती. त्यानंतर ११ महिन्यांसाठी भूखंड दत्तक देण्याचे तात्पुरते धोरण आणण्यात आले. सुधारित धोरणावर मागविलेल्या सूचना आणि हरकतींबाबत आॅगस्ट महिन्यात सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीनुसार दत्तक दिल्यानंंतरही मैदान, उद्यानात सर्वसामान्यांना मोफत प्रवेश देण्याचे धोरणात समाविष्ट करण्यात आले आहे. त्या मोकळ्या जागेत ज्या सुविधा पुरविण्यात येतील त्यासाठी कोणता दर ठेवावा, याबाबतही विचार सुरू आहे. भूखंडाची काळजी घेतली जात असल्याचा आढावा घेण्यासाठी छाननी समिती नियुक्त करण्यात येणार आहे.

आढावा घेणार; समिती स्थापन करणार

या धोरणानुसार बिगर शासकीय संस्था, गृहनिर्माण संकुल आणि कॉर्पाेरेट कंपन्यांना मनोरंजन मैदान, उद्यान पाच वर्षांसाठी दत्तक देण्यात येणार आहे.
देखभालीचा खर्च ते कसा उचलणार? हे त्यांना स्पष्ट करावे लागणार आहे. दत्तक घेतलेल्या भूखंडांची चांगली देखभाल केली जात आहे का, याचा आढावा घेतला जाणार
तपासण्यासाठी स्थानिक अ‍ॅडवान्स लोक्यालिटी मॅनेजमेंटचे कार्यकर्ते, स्थानिक नगरसेवक आणि वनस्पती तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.
करार रद्द करण्याचे अधिकारही या समितीला असणार आहेत.

Web Title: Adoption grounds and parks will be adopted for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई