मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मे महिन्यात देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी दर्जेदार आणि अनुभवी, तसेच १०० टक्के आपले योगदान देणाऱ्या नामांकित क्लासेसमध्ये कालरा शुक्ला क्लासेसने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. गेल्या २४ वर्षा$ंत या क्लासेसने सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांना मेडिकल अभ्यासक्रमात आणि त्यापैकी १२ हजार विद्यार्थ्यांना विशेष वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिला असल्याचे कालरा शुक्ला क्लाससचे संस्थापक आर. डी. शुक्ला यांनी सांगितले.विलेपार्ले पूर्व येथे कालरा शुक्ला क्लासेसने १२६ विद्यार्थ्यांपासून आपली मुहूर्तमेढ रोवली. आज मुंबई, पनवेल, खोपोली, पुणे, बारामती, पाटणा आणि बिहारमध्ये या क्लासेसने आपला विस्तार केला आहे. १४६ शाखांमधून सुमारे सात हजार विद्यार्थी नीट परीक्षेसाठी प्रवेश घेत असल्याची महिती शुक्ला यांनी दिली. या क्लासेसचा यशाचा आलेख हा चढता राहिला असून, येथे प्रवेश घेणाऱ्या सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांना चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी मुंबईतून या क्लासेसच्या ६३ यशस्वी विद्यार्थ्यांना चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये, तर ११२ विद्यार्थ्यांना संलग्न मेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.कालरा शुक्ला क्लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे १०६ तज्ज्ञ प्राध्यापकांसह ३६० जणांची टीम सज्ज आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ही टीम आपले १०० टक्के योगदान देते. वेळोवेळी दर आठवड्याला, तसेच परीक्षेच्या काळात जानेवारी ते एप्रिलदरम्यान सुमारे २५ पूर्व चाचणी परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे आमचे विद्यार्थी नीटच्या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जात असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली. काही कारणास्तव विद्यार्थी गैरहजर राहिल्यास आमच्या प्राध्यापकांची रेकॉर्ड केलेली लेक्चर आॅडिओ व्ह्युजवल माध्यमातून स्क्रिन आणि हेडफोनच्याद्वारे उपलब्ध करून देत असल्यामुळे, त्यांचा अभ्यास बुडत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
नीट प्रवेश परीक्षेत ‘कालरा शुक्ला’चे वर्चस्व
By admin | Published: June 19, 2017 3:14 AM