मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असून आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. हळूहळू विद्यार्थी या पद्धतीला कंटाळू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आॅनलाइन शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी शिकविण्याच्या नवीन पद्धतीचा अवलंब केल्याचे मत ५७.८ टक्के विद्यार्थ्यांनी मांडले.ब्रेनली या आॅनलाइन सर्वेक्षण संस्थेच्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, २२.३ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीतील बदल ओळखणे कठीण असल्याचे म्हटले. तर, १९.९% विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झाला नसल्याचे मत नोंदवले. या सर्वेक्षणात देशभरातील २,२७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.६४.८ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे एखाद्या विषयात आवड निर्माण होणे किंवा कंटाळा येतो, असे मत मांडले. तर अनेक विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणाने समाधानी असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले.आॅनलाइन शिकवणीच बरी52.6%विद्यार्थ्यांनी यापुढेही आॅनलाइन पद्धतीनेच वर्ग व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.31.6%विद्यार्थ्यांनी पारंपरिक वर्गाला पसंती दिली.28.1टक्के विद्यार्थ्यांनी आॅनलाइन शिकवणी हवी की नको, या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले.17.8टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनावर तटस्थ भूमिका घेतली.54.1%विद्यार्थ्यांनी आॅनलाइन वर्गात योग्य करिअर निवडण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत असल्याचे मत मांडले. शिक्षकांनी करिअर निवडीसाठी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन अभ्यासामध्ये शिक्षकांकडून नव्या पद्धतीचा अवलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 3:27 AM