अॅडल्ट फिल्मस्टारच्या वडिलांना मुंबईत अटक; बांगलादेशी मुलीला बनावट कागदपत्रांद्वारे दिलं भारतीय नागरिकत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:03 IST2025-01-31T18:01:41+5:302025-01-31T18:03:54+5:30
अॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री रिया बर्डेच्या सावत्र वडिलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

अॅडल्ट फिल्मस्टारच्या वडिलांना मुंबईत अटक; बांगलादेशी मुलीला बनावट कागदपत्रांद्वारे दिलं भारतीय नागरिकत्व
Mumbai Police: अॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री रिया बर्डे उर्फ बन्ना शेख प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. बनावट कागदपत्र देऊन पासपोर्ट काढल्याचा आरोपांखाली गेल्या वर्षी बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे हिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता रिया बर्डेच वडील अरविंद बर्डे यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. सावत्र वडील अरविंद बर्डे यांनी रियाचे भारतीय पासपोर्ट सारखी कागदपत्रे तयार करण्यास मदत केली होती. मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणात रियाच्या वडिलांनाही अटक केली आहे.
रिया बर्डेने राज कुंद्राच्या अॅडल्ट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या हॉटशॉट्समध्ये आणि इतर अनेक अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रियाने तिचे सावत्र वडील अरविंद बर्डे यांच्या कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट बनवल्याचे पोलीस तपासात उघड झाले. कागदपत्रांमध्ये रियाने ती अरविंद बर्डे यांची मुलगी असून तिचा जन्म अमरावती येथे झाल्याचे दाखवले होते. मात्र पोलीस तपासात रिया बांगलादेशी असल्याचे समोर आलं.रिया बर्डेचे खरे नाव 'बन्ना शेख' आहे. गेल्या वर्षी उल्हासनगरमधून पोलिसांनी तिला अटक केली होती.
रिया उर्फ बन्ना ही तिची आई आणि भावासोबत बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आली होती. त्यानंतर तिच्या आईने अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले आणि त्यांनी ते भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. पोलिसांनी रियासोबत तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले होते. रियाची आई आणि वडील त्यावेळी कतार येथे होते. त्यानंतर आता अरविंद बर्डे यांना मुंबईतून अटक केली आहे.
रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित होती आणि तिने अनेक पॉर्न फिल्म्समध्ये काम केले होते. याशिवाय रियाला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही या नावानेही ओळखले जायचं. मुंबई पोलिसांनी रियाला याआधी वेश्याव्यवसायच्या आरोपाखाली अटक देखील केली होती. मात्र त्यावेळी तिच्याकडे सर्व बनावट कागदपत्रे होती. त्यामुळे पोलिसांचीही तिने फसवणूक केली. शेवटी रियाच्याच एका मित्राने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.