अत्याधुनिक कॉम्पॅक्टर : कचऱ्याची सरमिसळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 04:09 AM2018-08-14T04:09:12+5:302018-08-14T04:09:23+5:30

ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली असली तरी प्रत्यक्षात कचरा उचलणाºया गाड्यांमध्ये हा कचरा एकत्रित होऊन कचराभूमीवर जात होता.

Advanced Compactor: There is no solution to the trash | अत्याधुनिक कॉम्पॅक्टर : कचऱ्याची सरमिसळ नाही

अत्याधुनिक कॉम्पॅक्टर : कचऱ्याची सरमिसळ नाही

googlenewsNext

मुंबई : ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली असली तरी प्रत्यक्षात कचरा उचलणाºया गाड्यांमध्ये हा कचरा एकत्रित होऊन कचराभूमीवर जात होता. यामुळे महापालिकेवर टीकेची झोड उठत होती. मात्र मुंबईसाठी उपलब्ध कचराभूमी बंद होत असल्याने कचºयाचा प्रश्न मिटवण्यासाठी वर्गीकरण महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी अखेर महापालिकेने अत्याधुनिक स्वरूपाच्या साइड लोडिंग कॉम्पॅक्टरच्या सेवा कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात ओला, सुका व ई-कचºयासाठी स्वतंत्र कप्पा असल्याने कचरा एकमेकांत मिसळणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. देशात अशा प्रकारच्या कॉम्पॅक्टरचा वापर प्रथमच होत आहे.
संपूर्ण मुंबईतून उचलण्यात येणारा कचरा देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड कचराभूमीवर टाकण्यात येतो. मात्र मुलुंड आणि देवनार कचराभूमीवर कचरा टाकण्याची मुदत संपत आली आहे. त्यामुळे पर्यायी कचराभूमी मिळेपर्यंत कचºयाचे प्रमाण कमी करण्यासाठी भर देणे हाच मार्ग महापालिकेपुढे उरला आहे. त्यानुसार शंभर किलो कचरा दररोज निर्माण करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांना ओल्या कचºयावर त्यांच्या आवारातच प्रक्रिया करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. मात्र नागरिकांनी कचºयाचे वर्गीकरण केले तरी महापालिकेच्या गाड्यांमधून हा कचरा एकत्र जात असल्याने महापालिकेकडूनच या उद्देशाला हरताळ फासला जात होता.
अखेर महापालिकेने अत्याधुनिक स्वरूपाच्या साइड लोडिंग कॉम्पॅक्टरच्या सेवा कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या साइड लोडिंग कॉम्पॅक्टरमध्ये गाडीच्या डाव्या बाजूने कचरा डबा उचलण्याची सुविधा असल्याने या गाड्या वाहतुकीच्या दृष्टीने सुविधाजनक असणार आहेत. असे कॉम्पॅक्टर हे देशात प्रथमच वापरात येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. प्रत्येक विभागात दोन ते चार कॉम्पॅक्टर हे साइड लोडिंग पद्धतीचे असणार आहेत.
हे कॉम्पॅक्टर्स सर्व २४ विभागांत टप्प्याटप्प्याने वापरात येणार आहेत. कचरा संकलन केंद्रांतून तसेच प्रत्येक इमारतीतून कचरा जमा करून कचराभूमीपर्यंत वाहून नेण्यासाठी या कॉम्पॅक्टरचा उपयोग केला जाणार आहे.

रोज ७,२00 मेट्रिक टन कचºयाचे व्यवस्थापन

मुंबईत दररोज सरासरी सात हजार २०० मेट्रिक टन एवढ्या कचºयाचे व्यवस्थापन केले जाते. कचरा उचलण्यासाठी सध्या लहान आणि मोठे मिळून ९८७ कॉम्पॅक्टर कार्यरत आहेत. यामध्ये महापालिकेचे २१३ आणि कंत्राटदारांकडून भाडे पद्धतीने सेवा घेतलेल्या ७७४ कॉम्पॅक्टरचा समावेश आहे.
नवीन ३९९ मोठे कॉम्पॅक्टर्स व २४६ लहान कॉम्पॅक्टर भाड्याने घेण्यात येणार आहेत. या सर्व कॉम्पॅक्टरमध्ये जीपीएस, आरएफआयडी रिडर या अत्याधुनिक सुविधांसहसह ओला कचरा, सुका कचरा व ई-कचरा यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा असल्याने कचरा एकमेकात मिसळणार नाही, याची दक्षता आपोआपच घेतली जाणार आहे.
६४५ कॉम्पॅक्टरच्या सेवा निविदा आधारित कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेण्यास सुरुवात करण्यात येत आहे. यात सहा टन कचरा वहन क्षमता असणाºया ३९९ मोठ्या तर अडीच टन कचरा वहन क्षमता असणाºया २४६ लहान कॉम्पॅक्टरचाही समावेश आहे.
या अत्याधुनिक कॉम्पॅक्टरच्या वापराची सुरुवात पी-उत्तर (मालाड) व पी-दक्षिण (गोरेगाव) या दोन विभागांच्या कार्यक्षेत्रात येत्या २१ आॅगस्टपासून होणार आहे. यानुसार या दोन्ही विभागांत ४८ मोठे, तर १४ लहान कॉम्पॅक्टर वापरात येणार आहेत. उर्वरित २२ विभागांत सहा ते आठ महिन्यांत या कॉम्पॅक्टरच्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत.
कंत्राटदारास करण्यात येणारे अधिदान हे आॅनलाइन जीपीएस व आरएफआयडी प्रणालीमार्फत निर्माण होणाºया अहवालानुसार होणार आहेत. प्रत्येक कचºयाच्या डब्याला आरएफआयडी टॅग लावण्यात येणार आहे. कॉम्पॅक्टरमध्ये बसविण्यात आलेल्या आरएफआयडी रीडरमुळे प्रत्येक डबा कधी उचलला गेला याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. डबा उचलला न गेल्यास त्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. प्रत्येक कॉम्पॅक्टर भरलेला असताना व रिकामा झाल्यावर वजन होणार असून त्याची माहिती रियल टाइम बेसीसवर आॅनलाइन उपलब्ध होणार आहे.

Web Title: Advanced Compactor: There is no solution to the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.