जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड?

By admin | Published: December 12, 2014 10:41 PM2014-12-12T22:41:31+5:302014-12-12T22:41:31+5:30

मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर धामणी गावच्या हद्दीत पुण्याकडे जाणा:या लेनच्या बाजूच्या मोकळय़ा जागेतील झाडे तोडण्यात आली आहेत.

Advertising Trees? | जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड?

जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड?

Next
अमोल पाटील ल्ल खालापूर
मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर धामणी गावच्या हद्दीत पुण्याकडे जाणा:या लेनच्या बाजूच्या मोकळय़ा जागेतील झाडे तोडण्यात आली आहेत. आयआरबी डेल्टा फोर्स व पोलिसांची सतत ये - जा असताना सुमारे 1क्क् हून अधिक झाडांची कत्तल केल्याने निसर्गप्रेमींत संताप पसरला.
रस्त्याच्या कडेला जाहिरातीचे फलक लावण्यासाठी अनेक ठिकाणी अशा प्रकारे कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचेही बोलले जात आहे. मुंबई-पुणो द्रुतगती मार्गाची निर्मिती झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. 1999 साली हा महामार्ग सुरू झाला. तेव्हापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले वृक्ष मोठे झाल्याने परिसर हिरवागार झाल्याचे दिसते. या मार्गावर मोठय़ा प्रमाणात जाहिरातीचे फलक लावण्यात आले आहेत. जाहिरातीचे फलक उभे करून दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
धामणी गावाजवळ पुण्याकडे जाणा:या लेनच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळय़ा जागेत लावण्यात आलेले 1क्क् हून अधिक वृक्ष कटरच्या सहाय्याने तोडले आहेत. आयआरबीचे अधिकारी गांधी यांनी कानावर हात ठेवत माहिती नसल्याचे सांगितले. तर पी. के. शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे संकेत दिले.
 
ही घटना अतिशय गंभीर असून तातडीने झाडे तोडल्याच्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे वृक्षांची कत्तल होत असेल तर असले प्रकार तातडीने थांबविण्यासाठी पावले उचलू.
-जगदीश म्हात्रे, वनपाल, खालापूर

 

Web Title: Advertising Trees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.