महाविद्यालयीन प्रशासनाचा विद्यार्थ्यांना स्टडी टुअरसाठी मद्य सोबत घेण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:11 AM2019-01-25T05:11:10+5:302019-01-25T05:11:15+5:30

थंड हवेच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल व्हिजिटसाठी जात आहात तर सोबत मद्य घेऊ शकता;

Advice for college administration students to take alcohol for study tourism | महाविद्यालयीन प्रशासनाचा विद्यार्थ्यांना स्टडी टुअरसाठी मद्य सोबत घेण्याचा सल्ला

महाविद्यालयीन प्रशासनाचा विद्यार्थ्यांना स्टडी टुअरसाठी मद्य सोबत घेण्याचा सल्ला

Next

मुंबई : थंड हवेच्या ठिकाणी इंडस्ट्रिअल व्हिजिटसाठी जात आहात तर सोबत मद्य घेऊ शकता; कारण आपण जेथे जाणार आहात तेथे मद्य घेतल्यास बोचऱ्या थंडी-वाºयापासून सुरक्षित राहू शकाल, असा सल्ला चक्क महाविद्यालयीन प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिला. मालाडच्या एमकेईएस लॉ कॉलेजची इंडस्ट्रीअल व्हिजिट नैनिताल येथे जात आहे. मात्र खुद्द प्राचार्यांच्या अशा सूचनांमुळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन प्रशासनाची विद्यार्थी संघटनेकडे तक्रारही केली आहे.
विद्यार्थिनींनी या प्रकरणी थेट संचालकांकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली. मात्र, प्राचार्यांच्या सूचना योग्य असल्याचा दुजोरा संचालकांनी दिला. विद्यार्थिनींनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर संघटनेकडे धाव घेतली. त्यानंतर, यासंदर्भात महाविद्यालयीन प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिल्याची माहिती लॉ स्टुडण्ट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.
इंडस्ट्रिअल व्हिजिटसाठी महाविद्यालयाने निवडलेले ठिकाण खूप दूरवर आहे. रस्त्यात पोलीस विचारणा झाली किंवा यामुळे काही अपघात घडल्यास महाविद्यालय जबाबदारी घेणार का, असा सवाल पवार यांनी केला. महाविद्यालयीन प्रशासन उत्तर द्यायला तयार नसल्याने त्यांनी थेट कुलगुरूंना यासंबंधी तक्रार केली करून कारवाईची मागणी केली.
>लवकरच प्राचार्यांसोबत बैठक
विद्यार्थ्यांना असा काही सल्ला दिला जाणार नाही, यासंदर्भात लवकरच प्राचार्या वंदना दुबे यांच्यासोबत बैठक घेतली जाईल. यासंबंधी योग्य ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत लवकरच पोहचवली जाईल - अँसी जोस, विश्वस्त

Web Title: Advice for college administration students to take alcohol for study tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.