Join us

आठवलेंना प्रतीक्षा करण्याचा सल्ला

By admin | Published: January 23, 2017 6:09 AM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) मात्र

जमीर काझी / मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) मात्र आपली प्राथमिक भूमिका भाजपा श्रेष्ठींकडे मांडली आहे. भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्यास किमान २८ व सेनेसमवेत रिंगणात उतरण्याचे झाल्यास किमान १५ जागा द्याव्यात, असा प्रस्ताव आरपीआयने बनविला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ‘प्रतीक्षा करा’ असे सांगिल्याचे सूत्रांनी सांगितले. आठवले गटाने भाजपाची शिवसेनेबरोबर युती न झाल्यासदेखील भाजपासमवेत कायम राहणार असल्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे. सध्याच्या सभागृहात रिपाइंचा एक नगरसेवक आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वर्चस्वासाठी सत्तारूढ भाजपा व सेनेतच जोरदार चढाओढ आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांच्या सभागृहात ५० ते ५५ ठिकाणी दलित मते निर्णायक आहेत. त्यामुळे आरपीआयच्या विविध गटा-तटांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यात केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले गटाचे महत्त्व निश्चितच अधिक आहे.