गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघा’ची स्थापना, राजकारणात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 03:34 PM2022-05-09T15:34:51+5:302022-05-09T15:53:43+5:30

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अखेर राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

advocate gunaratna sadvarte formed st kastakari jansangh entry into the politics | गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघा’ची स्थापना, राजकारणात एन्ट्री

गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘एसटी कष्टकरी जनसंघा’ची स्थापना, राजकारणात एन्ट्री

googlenewsNext

Gunaratna Sadavarte : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अखेर राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघा’ची स्थापना केली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी यासंदर्भातील घोषणा केली. यावेळी सदावर्ते यांनी जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या.

गुणरत्न सदावर्ते यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली असून एसटी महामंडळ सहकारी बँकेच्या निवडणुकीत ते आपलं पॅनल उभं करणार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. सोमवारी गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नव्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची घोषणा केली. तसंच एसटीच्या बँकेची निवडणूक हे पॅनल लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, ९५ टक्के कर्मचारी हे एस टी कष्टकरी जनसंघाचे सभासद असल्याचा दावा त्यांनी केला. “भीतीमुळे एसटी बँकेची निवडणूक घ्यायची हिंमत होत नाही. निवडणूक कधीही घेतली तरी विजय आमचाच होणार आहे. काही कष्टकऱ्यांना कामावर घेतलं जात नाही. तुरूंगात असलेल्या नवाब मलिक यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली का? सरकारनं यावर उत्तर द्यावं. माझं सांगणं आहे की लवकरात लवकर अटक केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या,” असंही ते यावेळी म्हणाले.त्

“वारंवार आम्हाला सांगण्यात आलं की स्थिती गिरणी कामगारांसारखी होईल. मात्र आम्ही लढाई लढत राहिलो. गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केला आहे. गांधींनी श्वास सोडताना हे राम म्हटलं असं सांगितलं जातं. परंतु ज्यावेळी नथुराम गोडसेची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी त्यानं स्पष्ट केलं होतं की गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हटल नव्हतं,” असंही सदावर्ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख करत त्यांनी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचंही म्हटलं.

अमित शाहंची भेट घेणार
आज आम्ही ९२ हजार कष्टकऱ्यांसाठी नवीन पाऊल उचलत आहोत. माझे हे कष्टकरी राज्यातील प्रचारक आहेत हे या सरकारन लक्षात घ्यावं. आमचे कार्यकर्ते असणार नाहीत तर ते प्रचारक असतील. ते राज्यांत जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करतील. एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आगामी निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. आगामी काळात आम्ही सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. सध्या या सरकारन सांगितल आहे की अनेक कर्मचारी कर्जबाजारी आहेत, त्यामुळे ते मतदान करु शकणार नाहीत. मात्र असा कुठलाही नियम नाही. ही बाब आम्ही सहकर मंत्र्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं.

Web Title: advocate gunaratna sadvarte formed st kastakari jansangh entry into the politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.