‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी वकिलांनी कोट घालण्याची गरज नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:51 AM2020-05-22T02:51:42+5:302020-05-22T02:52:00+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने १३ मे रोजी वकिलांना काळा कोट, लांब काळा गाऊन परिधान न करण्याची मुभा दिली.
मुंबई : व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहताना वकिलांनी काळा कोट व गाऊन परिधान करण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी वकिलांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहताना काळा गाऊन व कोट परिधान करण्यापासून सवलत दिली. मात्र, न्यायालयाचे शिष्टाचार पाळावे, यासाठी वकील शर्टाला टाय व पांढऱ्या रंगाचा बँड लावू शकतात, असे परिपत्रकात म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने १३ मे रोजी वकिलांना काळा कोट, लांब काळा गाऊन परिधान न करण्याची मुभा दिली. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानेही परिपत्रक काढले. कोट, गाऊनमुळे कोरोनाची लागण पटकन होते, असे म्हणत सर्वोच्च न्यायलायने वकिलांना ते घालण्यापासून मुभा दिली आहे.