मुंबई : व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहताना वकिलांनी काळा कोट व गाऊन परिधान करण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी वकिलांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहताना काळा गाऊन व कोट परिधान करण्यापासून सवलत दिली. मात्र, न्यायालयाचे शिष्टाचार पाळावे, यासाठी वकील शर्टाला टाय व पांढऱ्या रंगाचा बँड लावू शकतात, असे परिपत्रकात म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने १३ मे रोजी वकिलांना काळा कोट, लांब काळा गाऊन परिधान न करण्याची मुभा दिली. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानेही परिपत्रक काढले. कोट, गाऊनमुळे कोरोनाची लागण पटकन होते, असे म्हणत सर्वोच्च न्यायलायने वकिलांना ते घालण्यापासून मुभा दिली आहे.
‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी वकिलांनी कोट घालण्याची गरज नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 2:51 AM