अ‍ॅफॅक इंग्लिश स्कूल : उद्योगशील सुजाण नागरिक घडविणारी शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:05 AM2020-03-16T03:05:22+5:302020-03-16T03:05:50+5:30

ज्ञान रचनावादी, कृतियुक्त विद्यार्थी केंद्रित पद्धतीचा अवलंब करत आनंददायी शिक्षण संस्थेत दिले जाते.

Affac English School: A school for industrialized intelligent citizens | अ‍ॅफॅक इंग्लिश स्कूल : उद्योगशील सुजाण नागरिक घडविणारी शाळा

अ‍ॅफॅक इंग्लिश स्कूल : उद्योगशील सुजाण नागरिक घडविणारी शाळा

googlenewsNext

- सीमा महांगडे 

कलेच्या आधारावर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची पिढी घडविणारी शाळा म्हणून अ‍ॅफॅक इंग्लिश स्कूलची स्थापना १९६४ साली झाली. या शाळेत मराठी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले व पूर्व प्राथमिक ते माध्यमिक विभागास सुरुवात झाली. या अंतर्गत वाणिज्य, विज्ञान, बायोफोकल सायन्स, आयटी या शाखांचा समावेश करण्यात आला आहे. ज्ञान रचनावादी, कृतियुक्त विद्यार्थी केंद्रित पद्धतीचा अवलंब करत आनंददायी शिक्षण संस्थेत दिले जाते.

अत्याधुनिक वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निसंरक्षण यंत्रणा, सुरक्षिततेसाठी सर्वत्र कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुलांना खेळण्यासाठी भव्य पटांगण, कार्यक्रमासाठी सभागृह, गणिती कोपरा, खेळाच्या साहित्याची स्वतंत्र खोली अशा खोल्या असणाऱ्या छोट्या शाळेचे रूपांतर प्रशस्त अशा चारमजली इमारतीत झाले आहे. एम.यू. मंडलेचा यांनी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, तर शिक्षकांसाठी ताणतणावाचे व्यवस्थापन वर्गाचे आयोजन संस्थेमार्फत जूनच्या पहिल्या आठवड्या दरवर्षी केले जाते. शिक्षकांसह मुख्याध्यापक, तसेच संस्थेचे पदाधिकारी सतत नवे उपक्रम राबवित असतात.

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेचा न्यूनगंड कमी करण्यासाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने शाळेत स्पोकन इंग्लिशची सुरुवात व त्याद्वारे ग्लोबल स्कॉलर न्यूयार्क या आंतराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पृथ्वीवरील शाश्वत विकास मूल्य रुजविण्यासाठी शाळेतील तीन विद्यार्थी व शिक्षक सिंगापूर येथील कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी दारिद्र्य निर्मूलन, कुपोषण, गुणवत्तापूर्ण शिक्षण या तीन मूल्यांची निवड केली होती. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम शाळेत राबविले जातात. मराठी भाषा दिन सावित्री बाई फुले जयंती अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यलेखन नाटिका, वनभोजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अशा या प्रगतशील शाळेच्या घोडदौडीमध्ये सचिव जितेंद्र मांडलेचा व इतर पदाधिकाऱ्यांचे मार्दर्शन शिक्षकवर्गाला लाभत असते.
विद्यार्थ्यांसाठी कंदील बनविणे, पतंग तयार करणे, राख्या बनविणे, मेहंदी काढणे, टॅटू काढणे, शुभेच्छा पत्र बनविणे, भाज्या व फळांपासून तयार करण्यात आलेली विविध कलाकृती अशा स्पर्धांचे आयोजन होते. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणारे ‘करियर गायडन्स’, तसेच स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्यासाठी प्रत्येक महिन्याला स्वच्छ वर्गाला दिला जाणारा चषक.
प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपक्रमामध्ये दिवाळीला फटाके न वाजविणाºया विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, तसेच विविध उपक्रम राबविणाºया शिक्षकांचा गौरव वार्षिक स्नेहसंमेलमध्ये केला जातो.

जीवनावश्यक मूल्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रुजविणे हे शाळेचे उद्दिष्ट आहे. त्यातून सुजाण नागरिकांची पिढी शाळेला घडवायची आहे. विविध उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा यातून शाळा उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.
- साधना पाटील,
मुख्याध्यापिका माध्यमिक विभाग
 

Web Title: Affac English School: A school for industrialized intelligent citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.