भारत अफगाणिस्तानातील व्यापार अधिक वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:27 AM2020-10-06T01:27:14+5:302020-10-06T01:28:13+5:30

झाकिया यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

Afghanistans first woman Consul General in Mumbai takes charge | भारत अफगाणिस्तानातील व्यापार अधिक वाढविणार

भारत अफगाणिस्तानातील व्यापार अधिक वाढविणार

Next

मुंबई : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे राज्यपालांना संगितले.

भारताने अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत बांधून दिली, तसेच अफगाणिस्तानच्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत असल्याबद्दल वर्दक यांनी भारताचे आभार मानले.

चाबहार बंदर प्रकल्प उभय देशांमधील व्यापारवृद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात चाबहार बंदर प्रकल्पाचा अधिकतम वापर होण्यात उद्भवणाऱ्या नियमात्मक अडचणी सोडविण्यासाठी भारताने मदत करावी, अशी विनंती वर्दक यांनी राज्यपालांना केली. भारतासोबत व्यापार-वाणिज्य वाढविण्यात येणाºया अडचणी तसेच त्यावरील संभाव्य उपाय नमूद करून आपणास टिप्पणी दिल्यास आपण समस्यांचा परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले. अफगाणिस्तान येथे आपण अनेक भारतीयांच्या सहवासात वाढलो. भारत आणि अफगाणिस्तानी लोकजीवन अगदी सारखे आहे.

पेहराव, भाषा, खाद्यपदार्थ व संस्कृतीही सारखी आहे. बॉलिवूड चित्रपटांमुळे हिंदी भाषा तेथे बहुतेकांना समजते, असे झाकिया वर्दक यांनी राज्यपालांना सांगितले.

भारताने अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत बांधून दिली, तसेच अफगाणिस्तानच्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत असल्याबद्दल वर्दक यांनी भारताचे आभार मानले. न्हावाशेवा तसेच कांडला येथून चाबहार मार्गे थेट व्यापार होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

Web Title: Afghanistans first woman Consul General in Mumbai takes charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.