आफ्रिकेतील तरुणाने केली ब्रेन ट्युमरवर मात; खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:55 AM2020-02-03T06:55:40+5:302020-02-03T06:56:36+5:30
ब्रेन ट्युमरचे नाव जरी कानावर आले, तरी अंगाचा थरकाप उडतो.
मुंबई : ब्रेन ट्युमरचे नाव जरी कानावर आले, तरी अंगाचा थरकाप उडतो. मात्र, जीवन-मरणाच्या परीक्षेत जगण्याची उमेद हरवू न देता, मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयाने आफ्रिकेतील घाना येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला नवे आयुष्य मिळवून दिले. सुमारे आठ तास सुरू असलेली ही शस्त्रक्रिया डॉक्टरांकरिता आव्हानात्मक असूनही मोठ्या जिद्दीने न्युरोएण्डस्पाइन सर्जन डॉ. माझदा तुरेल आणि त्यांच्या चमूने मोठ्या प्रयत्नाने यावर यशस्वीपणे मात केली.
आफ्रिकेतील घाना येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक उद्भवलेली डोकेदुखी, तसेच बोलण्याची क्षमता घालविल्याने धक्का बसला. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असल्याने, आफ्रिकेतील डॉक्टरांनी मात्र याकरिता नकार दिला. मुलाचा जीव वाचावा, तसेच त्याला पूर्ववत आयुष्य जगता यावे, याकरिता या विद्यार्थ्याच्या पालकांनी मुंबई रुग्णालयात धाव घेतली. तपासणीअंती या विद्यार्थ्याला ब्रेन ट्युमरचे निदान झाले. त्याची उजवी बाजू हळूहळू अकार्यक्षम होऊ लागली होती. या साºयातच त्याची दृष्टीदेखील कमी होत चालली होती.
याविषयी डॉ. माझदा तुरेल सांगतात, सप्टेंबर, २०१९ मध्ये रुग्णाला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याला ८ बाय १० सेंटीमीटरचा ट्युमर असल्याचे दिसून आले. सेरिब्रोस्पाइनल फ्लुइड जमा होणाºया ठिकाणाहून हा ट्युमर बाहेर पडत आहे. ट्युमरमुळे या द्रव्याच्या मार्गात अडथळा निर्माण होत होता.
त्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह हाइड्रोसेफेलससारखी परिस्थिती निर्माण होत होती. यावर शस्त्रक्रिया करणे हा एकमेव उपाय होता. एका आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून हा ट्युमर काढण्यात आला. हा ट्युमर पूर्णपणे काढल्यानंतर सेरिब्रोस्पाइनल फ्लुइडच्या मार्गातील अडथळा दूर झाला. दोन आठवड्यांनंतर रुग्णाला घरी पाठविण्यात आले. त्याची प्रकृती आता ठिक असल्याचे नातलगांनी सांगितले़
आफ्रिकेतील डॉक्टरांचा नकार
महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया विद्यार्थ्याला अचानक उद्भवलेली डोकेदुखी, तसेच बोलण्याची क्षमता घालविल्याने धक्का बसला. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असल्याने, आफ्रिकेतील डॉक्टरांनी मात्र याकरिता नकार दिला.