आफताब आलम टोळी गजाआड

By admin | Published: July 11, 2015 11:43 PM2015-07-11T23:43:32+5:302015-07-11T23:43:32+5:30

मुंबई, नवी मुंबईत खंडणीसत्र आरंभून बडया बांधकाम व्यावसायिकांवर दहशत प्रस्थापित केलेल्या गँगस्टर आफताब आलम उर्फ विक्की याच्या सहा साथीदारांना गुन्हे

Aftab Alam gang goad | आफताब आलम टोळी गजाआड

आफताब आलम टोळी गजाआड

Next

मुंबई : मुंबई, नवी मुंबईत खंडणीसत्र आरंभून बडया बांधकाम व्यावसायिकांवर दहशत प्रस्थापित केलेल्या गँगस्टर आफताब आलम उर्फ विक्की याच्या सहा साथीदारांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले. या टोळीविरोधात नवी मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात आलमसोबत गँगस्टर रवी पुजारीलाही आरोपी करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या माहितीनुसार आलम हा पुर्वी डॉन छोटा राजनचा खास हस्तक होता. या कारवाईत अटक केलेले आरोपी आलमचे साथीदार आहेत. २००३च्या आसपास आलम देश सोडून पसार झाला. सध्या तो मलेशिया, बँकॉगमधून मुंबई, नवीमुंबईत गुन्हे घडवतो. विनोद विठ्ठल राजपेठे उर्फ बाळा(२६), शैलेश कष्णा उतेकर(४०) गोपाळ बाबू शेट्टी(३४), केशव बाळू भणगे(२८), प्रशांत शंकर तुलीया उर्फ अन्नु (२५) आणि नदिम शफिक काझी(४९) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांना १४ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दहिसरमधील एका बांधकाम व्यावसायिकाला १५ कोटींच्या खंडणीसाठी बँकॉग व मुंबईतून धमक्या येत होत्या. या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विनायक वस्त आण्ाि पथकाने तपास सुरू केला. तपासात या धमक्यांमागे आलमच्या टोळीचा सहभाग असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्याच्या साथीदारांच्या हालचालींवर नजर ठेवून खंडणी विरोधी पथकाने सखोल तपास सुरू केला. अखेर तांत्रिक तपासातून अटक आरोपी काझीची माहिती पथकाला मिळाली. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत अन्य पाचजण व आलम यांची माहिती पुढे आली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने वेगात हालचाली करून मुंबई, नवीमुंबईतून या सहाजणांच्या मुसक्या आवळल्या.
नवीमुंबईत राहाणारा काझी हा आलमचा साथीदार. तो, भनगे आणि अन्नू हे तिघे नवी मुंबईत इस्टेट एजंट म्हणून वावरत. शेतकऱ्यांची जमीन विकसीत करण्यासाठी व्यावसायिकाला देत. या व्यावसायिकाची माहिती आलमला पुरवत. तो पदेशातून व्यावसायिकाला खंडणीसाठी धमक्या देई. या कारवाईत काझीकडून एक फोन हस्तगत करण्यात आला. या फोनवरून तो आलमशीच बोलत असे. भनगेकडून ७.६५ बोअरचे पिस्टल , २ काडतुसे हस्तगत करण्यात आली.

दोन कोटींची मागणी
2014 मध्ये नेरुळ येथील एका व्यावसायिकास गँगस्टर रवी पुजारी याने धमकावून २ कोटींची
मागणी केली होती. यामध्ये आरोपी काझी, मुलीया
आणि भनगे याने मध्यस्थी घेऊन ७५ लाखावर सेटलमेंट केली होती. आपण व्यावसायिकाच्या बाजुने असल्याचे भासवून त्यांनी त्या व्यावसायिकाकडून तब्बल ३० लाख रुपये उकळले होते.

अंडरवर्ल्ड, गँगवॉर जोमात असताना आलमने मुंबई, नवीमुंबईसह गुजरात, राजस्थान आणि आंध्रप्रदेशात राजनच्या आदेशानुसार गंभीरस्वरूपाचे गुन्हे केले आहेत. आलम मुळचा नागपाडयाचा रहिवासी आहे.

गँगस्टर आलम हा पुर्वाश्रमी छोटा राजनचा अत्यंत विश्वासू साथीदार होता. आजघडीलाही तो राजनसोबतच आहे, स्वतंत्र आहे की अन्य गँगस्टरशी त्याने हातमिळवणी केली हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र अटक आरोपींच्या चौकशीतून आलमबाबची महत्वाची माहिती समोर येऊ शकेल.- गुन्हे शाखेचा अधिकारी

Web Title: Aftab Alam gang goad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.