तब्बल बारा तासांनंतर पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 08:38 PM2018-07-03T20:38:27+5:302018-07-03T21:19:02+5:30
सुमारे १२ तासांच्या खोळंब्यानंतर रात्री आठ वाजता अंधेरीहून चर्चगेटकडे जलद लोकल रवाना झाली.
मुंबई - अंधेरीजवळील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याने ठप्प झालेल्या पश्चिम रेल्वेच्या अप जलद मार्गावरील वाहतूक रात्री आठच्या सुमारास सुमारास सुरू झाली. सुमारे १२ तासांच्या खोळंब्यानंतर रात्री आठ वाजता अंधेरीहून चर्चगेटकडे जलद लोकल रवाना झाली. काही वेळाने डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. तर अप आणि डाऊन धीमा मार्ग रात्री १२ वाजेपर्यंत सुरु करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ कोसळलेल्या गोखले पुलामुळे पश्चिम रेल्वेची अंधेरी स्थानकावरून अप आणि डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर कोसळलेल्या पुलाचा ढिगारा हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
Dn fast line between Andheri - Vile Parle restored and cleared. Now both UP & Dn fast lines in this section have been opened for traffic on restricted speed. #WRUpdatespic.twitter.com/T2iZOlFvzz
— Western Railway (@WesternRly) July 3, 2018