Join us

बारावीनंतर करा डी.एल.एडमध्ये करिअर

By admin | Published: June 03, 2017 6:05 AM

कोठारी आयोगाच्या अहवालातील महत्त्वपूर्ण व सर्व परिचित विधान म्हणजे, राष्ट्राचे भवितव्य वर्ग खोलीत आकार घेत आहे. हे भविष्य

कोठारी आयोगाच्या अहवालातील महत्त्वपूर्ण व सर्व परिचित विधान म्हणजे, राष्ट्राचे भवितव्य वर्ग खोलीत आकार घेत आहे. हे भविष्य घडविण्याची महत्त्वाची भूमिका शिक्षकांना बजवावी लागते. वर्गात शिक्षक म्हणून कार्य करताना, विद्यार्थ्यांमध्ये कोणती मूल्ये रुजवावीत, संस्कार घडवून आणावेत, त्यांच्यातील उपजत क्षमतांची ओळख व त्यानुसार त्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या संधी, तसेच विविध कौशल्यांचा विकास या सर्व गोष्टींचे ज्ञान आणि कार्यात्मक प्रशिक्षण प्राथमिक शिक्षकाकडे असते. डी.एल.एड या प्रशिक्षणाविषयी थोडक्यात मार्गदर्शन.करिअर संधी : अनुदानित, विना अनुदानित, तसेच सरकारी शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षक या पदावर नियुक्ती होते. अध्यापन कार्य करत असताना, बाह्य विभाग, दुरस्थ शिक्षण, मुक्त विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी संपादन करता येते. एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. यासारख्या स्पर्धात्मक परक्षांचा सराव करून, शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातील अधिकारी, शिक्षणाधिकारी अशी जबाबदारीची पदेही भूषविता येतात.प्रवेश प्रक्रिया : आॅनलाइनसंकेतस्थळ : ६६६.े२ूी१३.ङ्म१ॅ.्रल्लशाखानिहाय प्रवेश कोटाच्विज्ञान शाखा-५०%च्कला शाखा-४०%च्वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी.-१०%च्अभ्यासक्रमाची माध्यमे : मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नडमुंबईतील अनुदानित अध्यापक विद्यालये (माध्यमनिहाय)मराठीएस.के. सोमय्या ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन, विद्याविहारताराबाई मोडक अध्यापक विद्यालय, दादरसमर्थ अध्यापक विद्यालय, दादरके.एम.एस. अध्यापक विद्यालय, परेलरमाबाई नवरंगे अध्यापक विद्यालय, ग्रँटरोडवनिता विनयालय अध्यापक विद्यालय, चर्नीरोडहिंदीएस.के. सोमय्या ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन, विद्याविहारइंग्रजीएस.के.सोमय्या ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन, विद्याविहारउर्दूए.के. आय. कुर्ला अध्यापक विद्यालय, कुर्लाआर. सी. इमामवाडा अध्यापक विद्यालय, सँटहर्स्ट रोडआर. सी. माहिम अध्यापक विद्यालय, माहिम (महिला)आर. सी. माहिम अध्यापक विद्यालय, माहिम (मिश्र)इतर विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांचा पर्याय उपलब्ध आहे.अर्थसहाय्यमागसवर्गीय संवर्गाकरिता समाज कल्याण विभागामार्फत विविध शिक्षण शुल्क सवलती मिळतात.डी.एल.एड. या अभ्यासक्रमाकरिता आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया ३१.५.२०१७ ते १६.६.२०१७ आहे.प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम कालावधी : दोन वर्षेप्रथम वर्ष अभ्यासक्रम : विभाग-अ-सैद्धांतिक व प्रात्याक्षिक विषयबालकांचा विकास व ‘स्व’ची जाणीवशिक्षण प्रक्रिया व समाजअभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन शास्त्र व मूल्यमापनइंग्रजी/मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व : भाग १भाषा विषयाचे अध्ययन अध्यापन शास्त्रइंग्रजी : अध्ययन अध्यापन शास्त्र-भाग १गणित : अध्ययन अध्यापन शास्त्रपरिसर अभ्यास : अध्ययन अध्यापनशास्त्रशालेय वातावरण व शारीरिक शिक्षणसंगणक परिचालनविभाग-ब-शिक्षक व्यक्तिमत्त्व-भाग १विभाग-क-शालेय आंतरवासिता-भाग १द्वितीय वर्ष अभ्यासक्रम : विभाग-अ-सैद्धांतिक व प्रात्यक्षिक विषयभारतीय समाज व शिक्षणशालेय संस्कृती, शालेय व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तनशिक्षणातील नवीन विचार प्रवाहइंग्रजी/मराठी भाषा संप्रेषण आणि प्रभुत्व-भाग २हिंदी : अध्ययन अध्यापन शास्त्रइंग्रजी : अध्ययन अध्यापन शास्त्र-भाग २विज्ञान आणि गणित : अध्ययन अध्यापन शास्त्रसामाजिक शास्त्र : अध्ययन अध्यापन शास्त्रकला शिक्षण : अध्ययन अध्यापन शास्त्रसंगणक उपयोजनविभाग ब : शिक्षक व्यक्तिमत्त्व- भाग-२विभाग क : शालेय आंतरवासिता- भाग-२प्रवेश पात्रता : महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील बारावी किंवा बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. कला, वाणिज्य, विज्ञान, एम.सी.व्ही.सी (महाराष्ट्राबाहेरील बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला अनिवार्य)आवश्यक गुण:-खुला संवर्ग किमान गुण - २९७ (४९.५%)मागासवर्गीय संवर्ग किमान गुण - २६७ (४४.५)वयोमर्यादा : नाही- स्नेहल गजानन फोडसे, अधिव्याख्याता, एस.के. सोमय्या ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन, विद्याविहार