मुंबई : अखेर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठही सज्ज झाले असून बुधवारपासून प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणी आवश्यक आहे.पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर आॅफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अॅण्ड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमिस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अॅण्ड एचएम, आरएम, एफएम अॅण्ड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाउस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज भरावा. अर्ज भरताना अडचणी आल्यास विद्यार्थी ०२०६६८३४८२१ या हेल्पलाइनवर संपर्क करू शकतात, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.>आॅनलाइन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्याप्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका खरेदी करून माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषय समूहाप्रमाणेच (उङ्मेु्रल्लं३्रङ्मल्ल) विषय निवडणे बंधनकारक असणार आहे.प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्ससाठी (प्रोग्राम) करता येईल.विद्यार्थ्याने शिक्षणक्रमनिहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्तऐवजासह सादर करावयाची आहे.प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी स्वत:चा स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी सोबत असणे आवश्यक आहे.प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्याचा स्वत:चा ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी.स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार हे विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून महाविद्यालयांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील.प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.>प्रवेशपूर्व नावनोंदणीचा विद्यार्थ्यांना फायदाप्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याला पीआरएन नंबर लवकर प्रदान केला जातो. तसेच परीक्षेचा अर्ज भरताना सर्व अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांकडे असल्याने हॉलतिकीट आणि गुणपत्रिका आॅनलाइन माध्यमाने उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद गतीने व सुलभरीत्या केली जाते.>आॅनलाइन नोंदणीप्रक्रियेचे वेळापत्रकअर्ज विक्री - २९ मे ते ७ जूनपर्यंत (कार्यालयीन दिवस)प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया - २९ मे ते १० जून.अॅडमिशन फॉर्मच्या प्रिंट आऊट महाविद्यालयात सादर करण्याची तारीख - ७ जून ते १३ जून (दुपारी १२.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाउस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.पहिली मेरीट लिस्ट -१३ जून (सायंकाळी ५.०० वाजता)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे -१४ ते १७ जून (सायं. ४.३० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस)द्वितीय मेरीट लिस्ट - १७ जून (सायं. ५.०० वा.)कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे - १८ ते २० जून (सायं.४.३० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस)तृतीय आणि शेवटची मेरीट लिस्ट - २० जूनकागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे -२१ ते २४ जून (सायं. ५.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस)
आॅनलाइन अर्जकसा करावा?विद्यार्थ्याने सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील (click on-Mumbai University Pre Admission online Registration २०१९-२०) या लिंकवर क्लिक करावे. ही लिंक २९ मे, २०१९ रोजी सकाळी ११ वाजेपासून कार्यरत होईल.नोंदणी करताना विद्यार्थ्याने स्वत:ची सर्व माहिती भरावी. एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाइल क्रमांकावर युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्याने सर्वप्रथम स्वत:बद्दलच्या माहितीची खातरजमा करून पासवर्ड बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड किंवा बदललेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वत:बद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर माहिती भरावयाची आहे.त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे.त्यानंतर उङ्मल्ला्र१े ढ१ङ्मा्र’ी वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल.आॅनलाइन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमूद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायची आहेत.च्एकदा पूर्ण आणि अचूक माहिती भरली गेल्याची खातरजमा करून भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात सादर करावयाची आहे.