गुढीपाडव्याच्या शुभदिनी 3 महिन्यांचा 'टायगर' करणार नव्या आयुष्याची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:37 PM2019-04-05T13:37:15+5:302019-04-05T13:38:25+5:30

गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी वाडिया बालरुग्णालयातील 3 महिन्यांचा टायगर नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. गेली दोन महिने टायगरवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरु होते

After 2 months treatment tiger will discharge tomorrow from Wadia Hospital | गुढीपाडव्याच्या शुभदिनी 3 महिन्यांचा 'टायगर' करणार नव्या आयुष्याची सुरुवात

गुढीपाडव्याच्या शुभदिनी 3 महिन्यांचा 'टायगर' करणार नव्या आयुष्याची सुरुवात

googlenewsNext

मुंबई - गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी वाडिया बालरुग्णालयातील 3 महिन्यांचा टायगर नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. गेली दोन महिने टायगरवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाळावर यशस्वी उपचार होऊन उद्या डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 

एका जोडप्याला ३० डिसेंबर २०१८ रोजी हे बाळ अंबरनाथमधील नाल्यामध्ये मिळाले होते. केवळ एक तासापूर्वी त्याचा जन्म झाला होता. त्यांनी त्या बाळाला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण मेंदूला संसर्ग झाल्याने २८ जानेवारी २०१९ रोजी या बाळाला वाडिया रुग्णालयातील निओनॅटल विभागात दाखल करण्यात आले. या बाळाला मेनिन्जायटिस आणि व्हेंट्रिक्युलिटिस हे गंभीर स्वरुपाचे आजार झाले होते. या संसर्गामुळे मेंदूच्या आतील द्रव (सेरेब्रोस्पायनल फ्लुइड) मेंदूच्या सर्व भागांपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. या संसर्गावर उपचार करण्यासाठी बाळाला अधिक तीव्र अँटिबायोटिक ओषधे इंजक्शनच्या माध्यमातून देण्यात आली. अँटिबायोटिक औषधे देऊनही संसर्ग तसाच राहिला आणि त्यामुळे मेंदूतील सीएसएफ जागेला जोडणाऱ्या त्वचेच्या खालच्या बाजूला साठा इन्सर्ट करण्यासाठी मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. या साठ्याच्या साहाय्याने या फ्लुइडच्या शाखा काढल्या आणि मस्तिष्क विवरात अँटिबायोटिक औषधे सोडता आली. 

संसर्गाचे गांभीर्य पाहता टायगरला अँटिबायोटिक्सचा दीर्घकालीन कोर्स द्यावा लागेल. त्याची अल्ट्रासाउंड चाचणी, सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्या नियमितपणे कराव्या लागल्या, जेणेकरून सेरेब्रोस्पायनल फ्लुइडला निर्माण होणाऱ्या अडथळ्यावर लक्ष ठेवता येईल. त्याला दाखल केले तेव्हा त्याचे वजन १.८ किलो होते आणि आता त्याचे वजन ३.४ किलो आहे. त्याला सध्या फिजिओथेरपी देण्यात येत आहे. येथून डिस्चार्ज दिल्यावरही ती सुरू राहील. 

वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, "या बाळाचा जीव आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वाचवला याचा मला अत्यंत आनंद झाला आहे आणि त्याला गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डिस्चार्ज दिल्यानंतरही त्याच्या डोक्याची वाढ आणि त्याचा विकास यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा नियमितपणे फॉलोअप घेण्यात येईल. 

सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे म्हणतात, "हॉस्पिटल आणि या बाळाला मदत करणाऱ्या  सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे बाळ आता तंदुरुस्त झाले आहे आणि त्याच्या उज्ज्वल व सुदृढ भविष्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

Web Title: After 2 months treatment tiger will discharge tomorrow from Wadia Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.