३१ मेनंतर नाही मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती! अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 09:35 AM2023-05-26T09:35:31+5:302023-05-26T09:35:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ...

After 31 May, post-matric scholarship will not be available! Call to Apply | ३१ मेनंतर नाही मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती! अर्ज करण्याचे आवाहन

३१ मेनंतर नाही मिळणार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती! अर्ज करण्याचे आवाहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पसंख्याक समाजातील गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपर्यंत असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अर्थसाहाय्य दिले जाते. मागासवर्गीय मुलांच्या पालकांना मुलांच्या शिक्षणाचा भार पडू नये आणि त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये, या उद्देशाने ही योजना राबविली जाते. यावर्षी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मेपर्यंत असून, यापूर्वी दोनदा मुदत वाढविण्यात आली असल्याने यापुढे मुदत मिळते की नाही याबाबत अनिश्चितता असल्याने पालकांनी वेळीच अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निकष काय?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये, तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न दीड लाखांपर्यंत असावे. या योजनेत फ्री शिपचीही सवलत मिळत असते. यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध या प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. 

त्रुटी 
योजनेच्या लाभासाठी सुरुवातीला १५ हजार २०७ अर्ज दाखल झाले होते. त्यातील त्रुटी असलेले ११० अर्ज अर्जदारांना परत पाठविण्यात आले.

मुदत
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ३० मेही अंतिम मुदत आहे. या मुदतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

काय आहे योजना?
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो.

विभागाकडे प्रस्ताव
महाविद्यालयांनी दिलेल्या मुदतीत अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

१५ हजारांहून अधिक अर्ज दाखल
शिष्यवृत्तीसाठी जिल्हाभरातून २२ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत ३० मेपर्यंत असल्याने अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: After 31 May, post-matric scholarship will not be available! Call to Apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.