३६ वर्षांनंतर मंदावणार ऐतिहासिक एशियाडची धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:52 AM2018-05-15T05:52:04+5:302018-05-15T05:52:04+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वात प्रभावी आणि यशस्वी ठरलेली एशियाड सेवा ३६ वर्षांनंतर आता बंद करण्यात येणार आहे.

After 36 years of the historic Asiad run! | ३६ वर्षांनंतर मंदावणार ऐतिहासिक एशियाडची धाव!

३६ वर्षांनंतर मंदावणार ऐतिहासिक एशियाडची धाव!

Next

महेश चेमटे 
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वात प्रभावी आणि यशस्वी ठरलेली एशियाड सेवा ३६ वर्षांनंतर आता बंद करण्यात येणार आहे. एशियाडच्या मार्गावर शिवशाही चालवण्यात येत असल्यामुळे ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल. याबाबत महामंडळाने थेट आदेश न देता मार्गांचे उन्नतीकरण करणे असे परिपत्रक प्रसिद्ध केले. परिणामी, तीन तप अर्थात ३६ वर्षे प्रवासी सेवेत असणारी ऐतिहासिक एशियाडची धाव आता कायमची थांबण्याच्या मार्गावर आहे.
नववी आशियाई स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली. स्पर्धेत २३ देशातील ३ हजार ४११ खेळाडूंनी सहभाग घेतला. या वेळी स्पर्धकांना निवासस्थान ते क्रीडांगणात ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाकडे सोपविण्यात आली. ही जबाबदारी सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने स्वत:च्या खासगी कार्यशाळेत १८० नव्या कोऱ्या बसगाड्या बांधल्या. ते वर्ष होते १९८२. याच निमआराम बस पुढे महामंडळाच्या ताफ्यात आल्या. आशियाई स्पर्धेत वापरलेल्या ‘एशियाड’ बस म्हणून ओळखल्या जात आहेत.
आरामदायी आसने, मजबूत बांधणी, यामुळे अल्पावधीत एशियाड प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे कोºया १८० बसच्या बांधणीपासून सुरू झालेल्या महामंडळाने सुमारे २ हजार बस महामंडळाच्या ताफ्यात सहभागी झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महामंडळाच्या अधिकाºयांनी एशियाडच्या रंगसंगतीमध्ये बदल केला. पारंपरिक पांढरा-हिरव्या रंगाऐवजी पांढरा-जांभळा अशा रंगसंगतीत बस रंगविण्यात आली. मात्र, महामंडळाच्या निर्णयावर प्रवाशांनी हरकती आणि तक्रारी नोंदविल्या. परिणामी, पारंपरिक पांढरी-हिरवी रंगसंगती कायम ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची आठवण महामंडळातील ‘एशियाड’च्या चालकाने सांगितली.
महामंडळाच्या कार्यशाळेतील अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एशियाडची बांधणी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. २०१६ साली शेवटची एशियाड बांधण्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ वाहन दुरुस्तीचे काम कार्यशाळेत सुरू आहे. माइल्ड स्टील (एमएस) बांधणीच्या बसही खासगी कंपनीकडून बांधून घेतल्या जातील. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविणाºया एशियाडसारख्या बस महामंडळाच्या कार्यशाळेत बांधल्या जात होत्या. तरीही खासगी कंपनीकडून बस बांधणी करणे हे न उलगडणारे कोडे आहे.
>महाव्यवस्थापकांचे नियंत्रकांना पत्र
एसटी महामंडळाने ७ डिसेंबर २०१७ रोजी ‘श्रेणी उन्नतीकरण’ या विषयाखाली राज्यातील सर्व विभाग नियंत्रकाना पत्र पाठविले. महामंडळाच्या पत्रानुसार, ‘रा.प.महामंडळाच्या ताफ्यामध्ये टप्प्याटप्प्याने वातानुकूलित शिवशाही दाखल होणार आहेत. सदर बस या सध्या धावत असलेल्या हिरकणी व रातराणीऐवजी सुरू करायच्या आहेत,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांच्या स्वाक्षरीने हे पत्र सर्व विभाग नियंत्रकांना पाठविण्यात आले आहे.
>भारमानदेखील ५६ टक्के
एशियाडमुळे त्या काळात महामंडळा एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली होती. दादर-पुणे मार्गापासून सुरू झालेल्या पहिल्या एशियाडने अल्पावधीत राज्यातील सर्व मार्गांवर यशस्वी धाव घेतली. एशियाडचे सरासरी भारमान हे ५६ टक्क्यांपेक्षा जास्त होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हे भारमान आदर्श मानले जाते, अशी माहिती एसटीतील महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाºयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

Web Title: After 36 years of the historic Asiad run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.