5 वर्षे 5 महिन्यांनंतर डिलाईल रोड सुसाट; ठाकरेंना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 09:47 AM2023-11-23T09:47:46+5:302023-11-23T14:07:57+5:30

या पुलाचे बांधकाम सन-२०१८ मध्ये सुरू करण्यात आल्यानंतर पुलावरून जाणारी बेस्ट बसची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

After 5 years and 5 months, Delil Road Susat in mumbai; Invitation to Thackeray | 5 वर्षे 5 महिन्यांनंतर डिलाईल रोड सुसाट; ठाकरेंना आमंत्रण

(छाया: दत्ता खेडेकर)

मुंबई :   अखेर ५ वर्षे ५ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी ना.म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळचा डिलाईल पूल खुला होत आहे. या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण आणि उत्तर मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुसाट जाता येईल. डिलाईल रोड पुलाचे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता शहर पालकमंत्री दीपक केसरकर आणि पश्चिम उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पूल आणि सरकत्या जिन्यांचे लोकार्पण केले जाणार आहे.

या पुलाचे बांधकाम सन-२०१८ मध्ये सुरू करण्यात आल्यानंतर पुलावरून जाणारी बेस्ट बसची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. लोअर परळ पुलाचे काम बऱ्याच कालावधीपासून रखडले होते. ना.म. जोशी मार्गावरील डिलाईल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. 

 दक्षिण आणि उत्तर मुंबईतील अंतर होणार कमी

ठाकरेंना आमंत्रण

डिलाईल रोड पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर पालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याल पुलाच्या अधिकृत उद्घाटनाप्रसंगी त्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. तरी स्थानिक आमदार आमंत्रित केले जातेच, त्यात नवीन नाही, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.

लोअर परळ पुलाच्या बांधणीचा प्रवास 
n जुलै-२०१८ : आयआयटीच्या अहवालानंतर पश्चिम रेल्वेने हा पूल वाहतुकीसाठी बंद.
n फेब्रुवारी-२०१९ : रेल्वे परिसरातील बांधकाम काढले.
n सप्टेंबर-२०१९ : पश्चिम रेल्वेच्या भागात काम सुरू.
n फेब्रुवारी-२०२० : महापालिकेच्या भागात काम सुरू.
n जून-२०२२ : पश्चिम रेल्वेने पहिला गर्डर बसवला.
n ऑक्टोबर-२०२२ : पश्चिम रेल्वेने दुसरा गर्डर बसवला.

पूर्व-पश्चिमेला जोडणारे सरकते जिने असणार 

लोअर परळचा पूल सुरू झाला, पण पूर्व-पश्चिम दोन्ही ठिकाणी जायचे असल्यास दोन्ही बाजूंच्या नागरिकांना लोअर परळचा अजस्र पूल ओलांडावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी तर गेली पाच वर्षे इथून तिथे जाणेच सोडले आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिमेला जोडणारे एस्कलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत, अशीही स्थानिकांची मागणी होती. त्यामुळे हा एस्कलेटरही सुरु करण्यात येणार आहे.

४ नवीन जिने बांधणार
जुन्या पुलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना.म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. नवीन बांधण्यात आलेल्या पुलामध्ये ४ नवीन जिने बांधण्यात येणार आहेत. तसेच २ सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. सेवा मार्गांची रुंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळ्या जागेमुळे पादचाऱ्यांची वहिवाट पूर्वीपेक्षा सुरळीत होणार आहे.

Web Title: After 5 years and 5 months, Delil Road Susat in mumbai; Invitation to Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.