Join us

आंदोलना नंतर खेळाच्या मैदानाबाहेर लागला पालिकेचा फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 9:46 PM

भाईंदर पुर्वेच्या सेव्हन स्कवेअर शाळे मागे महापालिकेचे २४६ क्र. चे खेळाचे आरक्षण आहे.

मीरारोड - महापालिकेच्या खेळाच्या मैदान आरक्षणा बाहेर पालिकेने फलक लावण्याची कार्यवाही केली असुन अन्य आरक्षणं ताब्यात घेण्यासाठी समिती नेमणे व आरजी जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करणे अशी आश्वासने मिळाल्याने या बाबत सुरु असलेले जिद्दी मराठा सह अन्य संस्थांचे उपोषण समाप्त करण्यात आले.

भाईंदर पुर्वेच्या सेव्हन स्कवेअर शाळे मागे महापालिकेचे २४६ क्र. चे खेळाचे आरक्षण आहे. या आरक्षणाचे २० हजार चौ.मी. क्षेत्रफळ असले तरी महापालिका मात्र टिडिआर देऊन २१ हजार चौ.मी. क्षेत्रफळ ताब्यात आल्याचे सांगते. परंतु विकास आराखड्यातील सदर आरक्षणाचा नकाशा पाहिल्यास सेव्हन सक्वेअर शाळेच्या मागे ७११ कंपनीने आपले कुंपण घालुन त्याचा खाजगी वापर चालवला असल्याच्या तक्रारी आहेत.

सदर जागा टिडिआरचा मोबदला देऊन ताब्यात घेण्यासह यात झालेले बेकायदा बांधकाम व अतिक्रमण हटवण्याची मागणी जिद्दी मराठाचे प्रदिप जंगम, आम आदमीचे ब्रिजेश शर्मा , सत्यकाम चे कृष्णा गुप्ता सह अनेकांनी चालवली आहे. तर पालिके कडुन कारवाई तर सोडाच उलट नगरसेवकांनी ठरवलेल्या महासभेतील धोरणा नुसार खेळाच्या मैदानाची आरक्षणाची जागाच विकासकाच्या घशात घालण्याचा घाट पालिकेने चालवला आहे.सदर आरक्षण खेळण्यासाठी खुले करावे यासह अन्य आरक्षणांच्या जमीनी ताब्यात घेणे व शहरातील वसाहतीं मधील आरजी जागेतील अतिक्रमणे हटवणे आदी मागण्यांसाठी उपोषणास सुरवात करण्यात आली होती. आमदार गीता जैन, उपमहापौर चंद्रकांत वैती, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली सह विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी सदर आंदोलनास भेट देऊन आपला पाठींबा दिला होता.आयुक्त बालाजी खतगावकर, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी समिती नेमण्याचे तसेच आरजीच्या भुखंडांवरील अतिक्रमण हटवण्याच्या कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले. तसेच आरक्षण क्र. २४६ येथे महापालिकेचे खेळाचे मैदान असा फलक लावण्यात आला. त्या नंतर आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले.

टॅग्स :मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकमीरा-भाईंदर